• Sat. Aug 15th, 2026
राज्यातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा फक्त एका क्लिकवर


Marathi Live News: केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या भावाची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दहा तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी सिया गोयलच्या आई-वडिलांचीही पाच तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. सिया, तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि कुटुंबीयांना या कटाची पूर्वकल्पना होती का; तसेच खूनाच्या कटाशी संबंधित इतर बाबींबाबत माहिती घेण्यात आल्याचे समजते. दरम्यान, चर्चगेट-नालासोपारा लोकलमधील खुनाची घटना ताजी असतानाच माहीम स्थानक परिसरात ‘सॉरी’ म्हटल्यानंतरही एका तरुणावर चाकूहल्ला झाल्याचे समोर आले आहे. स्थानक परिसरात चालताना तरुणाचा एका व्यक्तीला धक्का लागून त्याचा मोबाइल खाली पडला. त्या रागातून संबंधित व्यक्तीने तरुणावर चाकूने वार केले. जखमी तरुणावर शीव रुग्णालयात उपचार सुरू असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed