Praful Gudadhe On Vishwas Nagre Patil: विश्वास नांगरे पाटील हे माझा अर्बन नक्षल ठरवून एन्काऊंटर करू शकतात, असा गंभीर आरोप प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी केला.
नागपूर शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे पाटील यांनी, भाजपचे नेते आपल्याला ‘अर्बन नक्षल’ म्हणून संबोधत असल्याच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी प्रेरित असलेले शहराचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील हे आपल्याला ‘अर्बन नक्षल’ ठरवून एन्काऊंटर करू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे.
Raj Thackeray On Vishwas Nagare Patil: पोलिसांनी पक्ष, संघटनांपुढे बुद्धी गहाण ठेवू नये! राज ठाकरेंची विश्वास नांगरे पाटील यांच्यावर टीका
काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे हे शनिवारी माध्यमप्रतिनिधींशी बोलत होते. नांगरे पाटील यांची नुकतीच नागपूर शहराचे नवे पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांच्या जुन्या वक्तव्यांवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी संविधाननिष्ठ कर्तव्य पार पाडावे, की विशिष्ट विचारसरणीचा प्रभाव राहणार, हे स्पष्ट करावे, अशी मागणी गुडधे यांनी केली.
Crime News: ‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार; सीसीटीव्ही फुटेजमधून बिंग फुटलं!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात रुजू होणाऱ्या नांगरे पाटील यांच्या काही पूर्वीच्या सार्वजनिक विधानांमुळे आणि भूमिकांमुळे प्रशासनाच्या तटस्थतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. डॉ. हेडगेवार आणि त्यांच्या विचारसरणीबाबत नांगरे पाटील यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यांमुळे बिगर हिंदू समाजात असुरक्षिततेची भावना आहे. भाजपचे नेते आपल्यावर सातत्याने ‘अर्बन नक्षल’ असा शिक्का मारण्याचा प्रयत्न करीत आहे. या पार्श्वभूमीवर आपल्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करून गंभीर कारवाई केली जाऊ शकते, तसेच एन्काऊंटरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, नांगरे पाटील यांच्या भूमिकेवरून काँग्रेसने तीव्र आक्षेप नोंदवला आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी सार्वजनिक व्यासपीठांवर बोलताना संविधानिक चौकट, प्रशासकीय तटस्थता आणि निष्पक्षतेचे भान राखणे आवश्यक आहे, असेही काँग्रेसने म्हटले आहे.
