FDA Raid On Zepto: राज्यातील नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
प्रशासनाने या ऑनलाइन डिलिव्हरी सेंटरचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केला आहे. वेगवान सेवेच्या नावाखाली ग्राहकांच्या आरोग्याशी आणि जीवाशी खेळ सुरू असल्याचे या कारवाईमुळे स्पष्ट झाले.
या मोहिमेअंतर्गत मिळालेल्या गोपनीय माहितीची आणि ग्राहकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाच्या पथकाने १३ ऑगस्ट रोजी सिडको येथील झेप्टोच्या गोदामाची आणि साठवणूक केंद्राची आकस्मिक पाहणी केली. अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि अमित रासकर यांच्या पथकाने केलेल्या या तपासणीत अस्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उघड उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.
Aditya Thackeray: देवाच्या पैशांवरच भाजपचं लक्ष; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, मोर्चासाठी नाशिककरांना आवाहनअन्नपदार्थ साठवण्याच्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले होते. तसेच स्वच्छता व सुरक्षेच्या मूलभूत नियमांचे पालन केले जात नव्हते. ज्या ठिकाणी नागरिकांचे खाद्यपदार्थ साठवले जातात, त्याच ठिकाणी दुर्गंधी आणि आरोग्यास घातक ठरेल अशी अवस्था निर्माण झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कोणतीही गय न करता परवाना निलंबनाची कठोर कारवाई केली. या धडक कारवाईमुळे निष्काळजीपणे कारभार करणाऱ्या इतर ऑनलाइन अन्नपुरवठादार कंपन्यांचेही धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, ऑनलाइन अथवा ऑफलाइन खरेदी केलेल्या कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत, स्वच्छतेबाबत किंवा सुरक्षिततेबाबत शंका अथवा तक्रार असल्यास नागरिकांनी तत्काळ अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक विभागाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Nashik Crime : केमिकलमध्ये नोट टाकली, नंतर चपातीसारखी लाटली, नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्तगेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या तक्रारी येत होत्या. त्या तक्रारींची खातरजमा केल्यानंतर गोदामाची तपासणी करण्यात आली. या तपासणीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळल्या. त्यामुळे ‘मे. झेप्टो लिमिटेड’चा परवाना निलंबित करण्यात आला आहे.-अमित रासकर, अन्न सुरक्षा अधिकारी
