Central Railway 15 Coach Local: १५ डब्यांच्या लोकलच्या वाढीमुळे काही फेऱ्यांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. दोन खोपोली-परेल लोकल आता खोपोली-दादर म्हणून धावणार आहे.
पंधरा डब्यांच्या २२ फेऱ्यांपैकी ११ फेऱ्या सकाळ आणि सायंकाळी गर्दीच्या वेळेत धावणार आहेत. सकाळी गर्दीच्या वेळेतील ८.२७ ची अंबरनाथ-सीएसएमटी लोकल आणि सकाळी १० ची खोपोली-कर्जत लोकल १५ डब्यांची होणार आहे. रात्री ७.४२ ची सीएसएमटी-अंबरनाथ आणि रात्री ७.५० ची सीएसएमटी-कर्जत लोकलची १५ डब्यांची करण्यात आली आहे. नव्या लोकल फेऱ्या वाढणार नसल्याने मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील एकूण उपनगरी लोकल फेऱ्यांची संख्या १,८२० इतकीच राहणार आहे.
FDA Action : गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांची बेकायदेशीर विक्री, नागपूर आणि सोलापुरात एफडीएची धाड, डॉक्टरसह आरोपींवर कारवाईसीएसएमटी-अंबरनाथची १५ डब्यांची लोकल आता दादरवरून अंबरनाथसाठी रवाना होणार आहे. ही लोकल दादरहून रात्री ११.२३ वाजता सुटून मध्यरात्री १२.३० वाजता अंबरनाथला पोहोचेल. देखभालीसाठी ही फेरी शनिवारी रद्द राहणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय रेल्वेत सर्वप्रथम १५ डब्यांच्या लोकलची सुरुवात १६ ऑक्टोबर २०१२ रोजी झाली. त्यावेळी १६ फेऱ्या सुरू करण्यात आल्या. ४ एप्रिल २०१९ रोजी आणखी सहा फेऱ्यांची भर पडल्याने संख्या २२ झाली. त्यानंतर २० जुलै रोजी १२ डब्यांच्या आणखी १० फेऱ्यांचे १५ डब्यांत रुपांतर करण्यात आले आणि संख्या ३२ वर पोहोचली. आता आणखी २२ फेऱ्यांमुळे ही संख्या ५४ वर जाणार आहे.
Navi Mumbai CIDCO: सिडकोची खरडपट्टी; आसूडगाव जमीन प्रकरणात भरपाई देण्यातील दिरंगाईबद्दल न्यायालयाची तीव्र नाराजीसीएसएमटी ते कर्जत-खोपोलीदरम्यान १५ डबा गाड्या चालवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. आता सीएसएमटी ते टिटवाळा, आसनगाव, कसारादरम्यान लोकल फेऱ्यांची क्षमता वाढविणे गरजेचे आहे. पुढील महिन्यात या मार्गावर १५ डबा चालविण्याचे आश्वासन मिळाले आहे. तसे न झाल्यास जन आंदोलन छेडण्यात येईल. –राजेश घनघाव, अध्यक्ष, कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटना
