• Sat. Aug 15th, 2026

Pandharpur ATM Cyber Fraud Case : पोलिसांचा तपास अन् बँकेच्या दाव्यात गंभीर त्रुटी आढळल्याचं सांगत न्यायालयाने ताशेरे ओढले. या प्रकरणात यूपीतील दोघांना संशयाचा फायदा मिळाल्याने सुटका करण्यात आली.

पंढरपूर अर्बन बँक एटीएम ३ कोटी फ्रॉड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
​अरुण बाबर, सोलापूर (​पंढरपूर) : एटीएम मशीनच्या सेन्सरशी छेडछाड करून ‘एरर 902’ जनरेट करायचा आणि बँकेकडून लाखो रुपयांचा अपहार करायचा, या गाजलेल्या 3 कोटी रुपयांच्या सायबर फ्रॉड प्रकरणात पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपातून उत्तर प्रदेशातील दोन्ही आरोपींची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी के. आर. मोरे यांनी ससन्मान निर्दोष मुक्तता केली आहे.

15 मार्च 2023 ते 19 मे 2023

​बँकेचे तात्कालीन व्यवस्थापक राजेश औदुंबर आगवणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 मार्च 2023 ते 19 मे 2023 दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला होता. पंढरपूर अर्बन बँकेच्या मुख्य कार्यालयासह विविध जिल्ह्यांतील 22 एटीएम केंद्रांमधून 3 हजार 59 संशयास्पद व्यवहार झाले. आरोपी वेगवेगळ्या 26 बँकांचे तब्बल 668 एटीएम कार्ड वापरून पैसे काढत असत. पैसे बाहेर पडताना एटीएमच्या कॅश डोअर आणि सेन्सरला हाताच्या बोटांनी अडथळा निर्माण केला जायचा. यामुळे मशीनमध्ये ‘एरर 902’ असा मेसेज जनरेट व्हायचा. मशीनमधून रोख रक्कम हातात मिळूनही, पैसे मिळाले नाहीत, अशी खोटी तक्रार बँक आणि कस्टमर केअरकडे केली जायची.

Maharashtra TimesMumbai News : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील 15 एकर जागा ‘अदानी’ कंपनीला, 98 कोटींना पाच वर्षांसाठी भाडेतत्त्वावर मंजुरी
बँक ही रक्कम रिफंड म्हणून ग्राहकाच्या खात्यात पुन्हा जमा करायची. अशा प्रकारे बँकेची 3 कोटी 3 हजार 200 रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा करत 7 जून 2023 रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी उत्तर प्रदेशातून निरज नथुराम निषाद (वय 21, रा. कालपी, जि. जालोन) आणि आनंद कुमार रामसिंग (वय 30, रा. भोगनीपूर, जि. कानपूर देहात) या दोघांना जुलै 2023 मध्ये अटक केली होती.

न्यायाधीशांनी ताशेरे ओढले

​सुनावणीदरम्यान आरोपी क्रमांक 1 तर्फे ॲड. समाधान महामुनकर आणि आरोपी क्रमांक 2 तर्फे ॲड. विनायक सरवळे यांनी पोलिसांच्या तपासातील आणि बँकेच्या दाव्यातील गंभीर त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यावर न्यायाधीशांनी खालीलप्रमाणे ताशेरे ओढले. ​फिर्यादी किंवा बँकेचा कोणताही साक्षीदार आरोपींना एटीएम मशीन अथवा सेन्सरशी छेडछाड करताना प्रत्यक्ष पाहिलेला नाही. सर्व साक्षीदारांचे जबाब हे ‘ऐकीव माहितीवर’ आधारित होते. बँकेने दावा केला होता की आरोपींनी 668 एटीएम कार्ड्सचा वापर केला. मात्र, तपासी अधिकाऱ्यांनी या 668 कार्डधारकांपैकी एकाही मूळ ग्राहकाचा अथवा इतर बँकांचा जबाब नोंदवला नाही.

Maharashtra TimesPresident Medal: पुण्यातील कदम, स्वामी यांना राष्ट्रपती पदक; कदम CID, स्वामी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सेवेत
कार्ड हरवल्याची किंवा चोरीला गेल्याची एकही फिर्याद ऑन रेकॉर्ड आलेली नाही. पोलिसांनी सादर केलेले फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज आरोपींचे असले, तरी त्या फोटोंमध्ये आरोपी एटीएम सेन्सरशी छेडछाड करताना किंवा बेकायदेशीर कृत्य करताना दिसत नाहीत. सायबर गुन्ह्यात डिजिटल पुरावा सिद्ध करण्यासाठी आवश्यक असणारी ‘हॅश व्हॅल्यू’ पडताळणी करण्यात आली नव्हती. बँकेची तपासणी करणाऱ्या एनसीआर कंपनीच्या सर्व्हिस इंजिनिअरची उलटतपासणी घेतली असता, त्याने संगणक किंवा इलेक्ट्रॉनिक्स शाखेची कोणतीही पदवी घेतली नसल्याचे व तो आर्ट्स पदवीधर असल्याचं न्यायालयात समोर आलं.

आरोपींविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी

​दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे विचारात घेऊन न्यायाधीश के. आर. मोरे यांनी स्पष्ट केलं की, केवळ नैतिक संशयाच्या आधारावर कोणालाही दोषी ठरवता येत नाही. सरकारी पक्ष आरोपींविरुद्धचा गुन्हा संशयापलीकडे सिद्ध करण्यात पूर्णपणे अपयशी ठरला आहे. त्यामुळे संशयाचा फायदा आरोपींना मिळणे कायद्यानुसार रास्त ठरते. आरोपी इतर कोणत्याही गुन्ह्यात वर्ग नसतील तर त्यांची मध्यवर्ती कारागृहातून तात्काळ सुटका करण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले आहेत.

Maharashtra TimesNashik FDA Raid: नाशिकमध्ये Zeptoवर एफडीएची कारवाई! अन्न परवाना निलंबित, तपासणीत स्वच्छता-आरोग्यविषयक निकषांचं उल्लंघन

जप्तीचा अभाव, संशयास्पद विलंब

आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्या ताब्यातून एकही बनावट अथवा मूळ डेबिट कार्ड जप्त करण्यात पोलिसांना यश आलं नाही. तसेच अपहारातील एक रुपयाची रक्कमही आरोपींकडून रिकव्हर झालेली नाही. मार्च ते मे 2023 या तब्बल दोन महिन्यांच्या काळात 3 कोटींचा अपहार होत असताना बँकेच्या संगणक प्रणाली किंवा ऑडिट यंत्रणेच्या हे लक्षात का आलं नाही? आणि पोलिसांत फिर्याद देण्यास उशीर का झाला? याचं कोणतंही ठोस कारण सरकारी पक्षाला देता आलं नसल्याचं आरोपींचे वकील ॲड. विनायक सरवळे आणि ॲड. समाधान महामुनकर यांनी निदर्शनास आणून दिलं.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा