Raj Thackeray On Vishwas Nagare Patil: नुकतेच नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावर राज ठाकरे यांनी टीका केली. काय कारण?
सकल हिंदू संमेलन २०२६च्या व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्तुती करतानाचा आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचा व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल झाल्यानंतर त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरे यांनीही याविषयी एक पोस्ट लिहिली. ‘संघाविषयी आपुलकी असेल तर ती मनात ठेवा.
Mumbai Crime : मुंबईत घातपात घडवण्याचा होता मोठा डाव? मोहरमच्या मिरवणुकीत उंदीर मारण्याच्या गोळ्यांचे वाटप, 14 हजार गोळ्या जप्त
जाहीरपणे व्यक्त करायची असेल तर आधी सरकारी सेवेचा राजीनामा द्या आणि संघ किंवा भाजपमध्ये प्रवेश करा. नांगरे-पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलिस दलाचा आहे असा आमच्या समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळले. मर्जीतील अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसनाची हमी योजना सुरू आहे, तुमचेही पुनर्वसन होईल’, असा टोलाही राज यांनी मारला.
‘ नांगरे-पाटील यांनी संघाचे आणि त्यांच्या संस्थापकांचे केलेले कौतुक हे एका सरकारी अधिकाऱ्याच्या निष्पक्ष भूमिकेला साजेसे नाही. ही संमेलने राजकीयच आहेत आणि ती भरवणारे कोण आहेत, याचा थोडा शोध घेतला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल . त्यामुळे अशा कार्यक्रमात सरकारी सेवेत असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सहभागी होणे योग्य नाही’, असे राज यांनी लिहिले.
Tukaram Mundhe: मुंबईतील मोठ्या रक्तपेढीतील रक्त चोरीला; तुकाराम मुंढेंकडून कारवाईचा दणका, इशारा देत काय म्हणाले?
२०१२मधील घटनेचा दाखला
‘२०१२मध्ये रझा अकादमीविरोधी मनसेच्या मोर्चानंतर एका पोलिस कॉन्स्टेबलने मनसेचे अभिनंदन केल्यामुळे त्याच्यावर तत्कालीन सरकारने कारवाई केली होती’, याची आठवण त्यांनी करून दिली.
