Vidarbha Farmer Death Case: पश्चिम विदर्भात मागील पाच महिन्यांत ३१२ शेतकऱ्यांनी आपले जीवन संपविल्याची प्रकरणे समोर आली आहेत.
अमरावती विभागात जानेवारी मागील २६ वर्षांपासून शेतकरी आत्महत्या ंची स्वतंत्र नोंद ठेवण्यात येत आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात ५,६२३, अकोला …३५१, यवतमाळ ६,६२५, बुलढाणा ४,६९० तर वाशीम जिल्ह्यात २२१ शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. चालू वर्षात पाच महिन्यांत यवतमाळ जिल्ह्यात १०५, अमरावती ६२, अकोला ५९, वाशीम ४६ तर बुलढाणा जिल्ह्यात ४० शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे.
Ketan Agarwal : पूर्ण चौकशीविना लग्न लावू नका, केतनच्या आजोबांकडून भीती व्यक्त; सियाच्या विवाहाची घाई का करताय? गोयलांना दोन ऑप्शन दिलेले
शेतकऱ्याचे जीवनमान उंचावे या दृष्टीने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांसाठी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन स्थापन करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची आखण्यात आली. जलसंधारणाच्या कामांना अग्रक्रमही देण्यात आला. शासनाने कर्जमाफी केली तरीही शेतकरी आत्महत्या थांबत नसल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
शेतकरी आत्महत्येचा प्रश्न सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या आधारावर भाव द्यावा, बियाणे आणि खतांच्या वाढत्या दरांवर अनुदान देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Mumbai Rain Ritu Tawde: अर्रर्र…! महापौर रितू तावडेंकडून नालेसफाईचं कौतुक; मागे BMCचा अधिकारीच मॅनहोलमध्ये पडला
शेतकरी विधवांसाठी हवे स्वतंत्र महामंडळ
अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांमुळे २२,४९० कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या विधवांवर कुटुंबाचा भार आला. या शेतकरी विधवांसाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ स्थापन करून त्यांच्या उपजीविकेसाठी साधने उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
Pune News: पुण्यात दोन लेकरांसह घरात आढळली आईची बॉडी; नातेवाईकाने दिलेल्या माहितीतून घटनेचा उलगडा
अडीच दशकांपासून मदत एक लाखच
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला सरकारकडून मदत म्हणून एक लाख रुपये दिले जातात. या निर्णयात इतक्या वर्षांत एक रुपयाचीही वाढ करण्यात आलेली नाही. या मदतीसाठी शेतकऱ्यांना सरकारी निकषात पात्र ठरावे लागते. चालू वर्षातील ३१२पैकी ५० प्रकरणे शासकीय मदतीसाठी पात्र ठरले आहे. ५० अपात्र तर २१२ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित ठेवण्यात आली आहेत.
