President Medal : पुण्यातील कदम, स्वामी यांना राष्ट्रपती पदक; कदम CID, स्वामी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सेवेत
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपअधीक्षक जितेंद्र आनंद कदम आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक शिवानंद महादेव स्वामी यांना २०२६च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रपतींचे गुणवत्तापूर्ण सेवेचे पोलिस पदक जाहीर झाले आहे. कदम यांनी १९८८मध्ये पोलिस शिपाई म्हणून सेवेला सुरुवात केली. २००४मध्ये पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर त्यांनी नागपूर शहर, मुंबई शहर, महामार्ग सुरक्षा विभाग; तसेच पुणे शहरातील गुन्हे शाखा, वानवडी आणि कोंढवा पोलिस ठाण्यात विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या.