Raja Raghuvanshi on Ketan Agarwal Death : राजा रघुवंशी आणि केतन अगरवाल यांच्या मृत्यू प्रकरणांमध्ये साधर्म्य असल्याचे धागेदोरे शोधले जात असतानाच आता राजा रघुवंशीच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इंदौर/पुणे : लोहगडावरुन दरीत ढकलून केतन अगरवाल याचा खून त्याची नियोजित वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी याने केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर सर्वच स्तरातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. गेल्या वर्षी नववधू सोनम रघुवंशी हिने मेघालयात हनिमूनला गेल्यानंतर तिचा पती राजा रघुवंशी याची अशाच प्रकारे निसर्गरम्य निर्जन स्थळ निवडून बॉयफ्रेण्डच्या साथीने हत्या केली होती. दोन्ही घटनांमध्ये साधर्म्य असल्याचे धागेदोरे शोधले जात असतानाच आता राजा रघुवंशीच्या कुटुंबातून केतन अगरवाल प्रकरणी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
दोन्ही घटनांच्या प्लॅनिंगमध्ये साम्य
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत असतानाच राजा रघुवंशी हत्या प्रकरणही पुन्हा चर्चेत आले आहे. राजा रघुवंशीचा भाऊ सचिन रघुवंशी आणि मातोश्री उमा रघुवंशी यांनी केतन अगरवालच्या हत्येचा संबंध राजाच्या केसशी जोडला आहे. दोन्ही गुन्ह्यांच्या नियोजनातील साम्य त्यांनी अधोरेखित केले आहे.
सोनम जामिनावर बाहेर आल्यामुळे…
राजा रघुवंशीची हत्या करुनही सोनम तुरुंगातून जामिनावर बाहेर आली, केवळ याच कारणामुळे सिया गोयलने तिचा होणारा पती केतन अगरवाल याची हत्या केली. सोनम जामिनावर सुटली नसती, तर कदाचित पुण्यातील घटना घडली नसती. सोनमला मिळालेला जामीन सिया गोयलसाठी एक प्रकारे प्रेरणा ठरला, असा आरोप उमा रघुवंशींनी केला आहे. पतीच्या हत्येच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी आपल्या सरकारला आणि न्यायव्यवस्थेला आता कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. Neeraj Kumar : चेतन-केतन प्रकरणात आता तिसऱ्या तरुणाची एन्ट्री, फोनमुळे संशय बळावला, सिया गोयलशी काय कनेक्शन?
राजा रघुवंशीच्या भावाची प्रतिक्रिया
राजाचा भाऊ सचिन रघुवंशी याने केतन अगरवाल यांच्या कुटुंबीयांबद्दल शोकसंवेदना व्यक्त केल्या आणि संबंधित अधिकाऱ्यांना विनंती केली की, या शोकाकुल कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा यासाठी पावले उचलली जावीत. केतन हा कुटुंबाचा एकुलता एक मुलगा होता आणि त्याच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शेतकरी कर्जमाफीवरून महायुतीचे नेते भिडले, सभागृहातील वादानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया
“जर सियाला लग्न करायचे नव्हते, तर ती सरळ नकार देऊ शकली असती; खुनासारख्या कृत्याचा मार्ग स्वीकारण्याची काहीच गरज नव्हती. मागील प्रकरणात आरोपीला त्वरित दिलासा मिळाल्यामुळे इतरांच्या मनात कायद्याबद्दल चुकीचा समज निर्माण होऊ शकतो.” अशी भीतीही सचिनने व्यक्त केली.
केतनचा विचार करायचा होता
“सियाला मनपसंत जोडीदार हवा होता, पण तिने हे लक्षात घ्यायला हवे होते की केतन हा कोणाचा तरी मुलगा आणि भाऊ होता. केतन हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. आज त्याच्या कुटुंबावर काय प्रसंग ओढवला असेल, याची केवळ कल्पनाच केली जाऊ शकते.” असं सांगतानाच सचिन म्हणाला की, जर आधीच्या प्रकरणात कठोर कारवाई केली असती, तर कदाचित अशी घटना पुन्हा घडली नसती.
अगरवाल कुटुंबाची भेट घेणार
सचिन रघुवंशीने सांगितले की, केतनच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी ते कदाचित पुण्याला जातील. अशा घटनेचे दुःख स्वतः अनुभवलेले असल्याने पीडित कुटुंबाच्या परिस्थितीची ते मनापासून जाणीव ठेवू शकतात. Ketan Agarwal : पूर्ण चौकशीविना लग्न लावू नका, केतनच्या आजोबांकडून भीती व्यक्त; सियाच्या विवाहाची घाई का करताय? गोयलांना दोन ऑप्शन दिलेले कायदा आणि सुव्यवस्थेबाबत लोकांचा विश्वास टिकवून ठेवण्याच्या महत्त्वावर त्याने भर दिला. सचिन म्हणाला की, ‘कायदा आंधळा असतो’ ही म्हण मी पूर्वी ऐकत असे, परंतु आता मला याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा