Chandrashekhar Bawankule On Rahul Gandhi: राजकारणासाठी कोणत्याही स्तराला जाणे योग्य नाही. अशा वक्तव्यांना जनता योग्य उत्तर देईल, असेही बावनकुळे म्हणाले.
बावनकुळे शुक्रवारी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राजकीय टीका करताना संस्कार आणि मर्यादा पाळल्या पाहिजेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यामुळे देशाच्या संस्कृतीची बदनामी होत असल्याचा आरोप करत, त्यांनी या वक्तव्याबद्दल देशाची आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागावी, अशी मागणी बावनकुळे यांनी केली.
Nanded Santosh Kendre : नांदेडमध्ये पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांचा जीव वाचवणारे धडाकेबाज PI संतोष केंद्रे कोण? A टू Z माहितीओबीसी आणि मराठा समाजातील आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना दोन्ही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. मनोज जरांगे पाटील यांच्या मुद्द्यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नसल्याचे सांगत, ओबीसी संघटनांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
अनधिकृत बांधकामांवर बिल्डरांना इशारा
नागपूरमधील अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नावर शहरातील बिल्डरांना इशारा देताना बावनकुळे म्हणाले की, अंतर्गत नकाशा किंवा डीपी प्लॅनच्या नियमांचे उल्लंघन करून बांधकाम करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात बैठक घेतली असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले.नागपूरमध्ये पुराचा प्रश्न गंभीर असून, नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात इमारती उभारण्यात आल्या आहेत.
Ramraje Nimbalkar : जोपर्यंत राजा टिकून, तोपर्यंत खेळ जिवंत, रामराजेंचा इशारा नेमका कुणाला?सुमारे चार हजार अनधिकृत इमारतींच्या प्रकरणांवरही एकेक करून कार्यवाही सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्याप रजिस्ट्री झालेली नाही. नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बिल्डरांवर कारवाई केली जाईल, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.बिल्डरांना त्रास देणे हा शासनाचा उद्देश नसून, विकासकामे अधिकृत करून घेणे आणि नागरिकांच्या मालमत्तेच्या रजिस्ट्रीचा मार्ग मोकळा करणे हा हेतू आहे. दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
