Nashik Legislative Council Election Results Live : नाशिकमध्ये विधान परिषद निवडणूक मतमोजणीसाठीची प्रक्रिया झाली आहे. यात गोकुळ गितेंचा विजय झाला आहे.
नाशिक विधान परिषद निवडणूक निकाल(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या आमदारकीची माळ गोकुळ गितेंच्या गळ्यात पडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे ंचा पराभूत झाला आहे. जिल्हा प्रशासन मोजणीसाठी सज्ज झाले होते. काल रविवारी याबाबत पुन्हा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. आधी दुपारपर्यंत निकाल लागणार होता. मात्र, या निवडणुकीत गोकुळ गितेंचा विजय झाला आहे. त्याचदरम्यान, विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाल्यानंतर काही वेळातच आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपक्ष गोकुळ गितेंना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे. शिंदेंचा उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाल्याने त्यांच्याकडून नवी खेळी खेळण्यात येत आहे. तर गोकुळ गिते हे शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होणार
विधान परिषदेसाठी गुरुवारी (दि. १८) मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर ६१९ पैकी ६१८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यात विक्रमी ९९.८४ टक्के मतदानाची नोंद झाली. या निवडणुकीत महायुतीच्यावतीने शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे उमेदवारी करीत होते. याशिवाय अपक्ष म्हणून गोकुळ गिते आणि प्रसाद हिरे देखील रिंगणात असल्याने ही निवडणूक चुरशीची झाली होती. मतदान प्रक्रिया पार पडल्यापासून उमेदवारांसह समर्थकांना निकालाचे वेध लागले होते. अखेर आज निकाल लागला असून निवडकुणीचं चित्र स्पष्ट झालं आहे. Maharashtra Monsoon Session: आजपासून पावसाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी
…अशी होती मोजणीची प्रक्रिया
लेखा कोषागार विभागाच्या स्ट्राँग रूममध्ये ठेवलेल्या मतपेट्या सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य इमारतीमधील मतमोजणीच्या हॉलमध्ये आणण्यात आले. तेथे मोजणीसाठी चार टेबल होते. प्रत्येक टेबलवर तहसीलदार आणि नायब तहसीलदार दर्जाच्या प्रत्येकी एका अधिकाऱ्यासह दोन सहायक आणि एक शिपाई मदतीला नियुक्त असणार होते. पेटीतून काढलेल्या मतपत्रिकांचे २५- २५ चे गठ्ठे करण्यात आले होते. ते प्रत्येक टेबलवर वाटले गेले. त्यातील अवैध मते बाजूला काढून कोटा निश्चित करण्यात आले. तीन उमेदवार असल्याने तीन फेऱ्या झाल्या. निश्चित झालेला कोटा उमेदवाराने पहिल्याच फेरीत पूर्ण केल्यामुळे उमेदवाराच्या विजयाची घोषणा करण्यात आली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा