Maharashtra MLC Election Result 2026 : एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार या निवडणुकीत द्यायचा होता, 118 मतं देखील पडली नसती, असा टोला राजेंद्र राऊत यांनी अप्रत्यक्षपणे मोहिते पाटलांना लगावला
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
इरफान शेख, सोलापूर : भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा सोलापूर विधान परिषद निवडणुकीत 365 मतांनी विजय झाला आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांना फक्त 118 मतं पडली आहेत. विजयी झाल्यानंतर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटलांचे नाव न घेता टीका केली. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला होता, मात्र काही लोकांच्या इगोमुळे विधान परिषद निवडणूक लागली. ‘इतका इगो आणि मुझे गिनो’ असे चित्र वसंत देशमुखांना पुढे करून दाखवण्यात आला होता. एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार या निवडणुकीत द्यायचा होता, 118 मतं देखील पडली नसती, अशी प्रतिक्रिया राजेंद्र राऊत यांनी दिली आहे.
राजेंद्र राऊत 365 मतांच्या आघाडीने विजयी
सोलापूर विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी दणदणीत विजय संपादन केला आहे. राऊत यांना एकूण 483 मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना 118 मते मिळाली. मतमोजणीनंतर राजेंद्र राऊत यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 365 मतांची निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. या निवडणुकीत 13 मते अवैध ठरली. राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपले वर्चस्व कायम राखत विजयाचा झेंडा फडकवला आहे. Milind Narvekar : ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ भास्कर जाधवांचा बोचरा सवाल, ठाकरे गटात धुसफूस, आता मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, यांच्या मानसिक त्रासाचा फटका शिवसैनिकांना बसतोय…
निवडणूक निकाल
राजेंद्र राऊत (भाजप) – 483 मते वसंतराव देशमुख (राष्ट्रवादी काँग्रेस-शरद पवार गट) – 118 मते विजयाची आघाडी – 365 मते
Girish Mahajan यांचा फोटो व्हायरल, थेट फोटोंचे पुरावे दाखवले, म्हणाले, ‘आमचे कौटुंबिक संबंध’
Gokul Gite : नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?
‘एवढी खुमखुमी होती तर…’
आमदार राजेंद्र राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना थेट मोहिते पाटलांना ओपन चेलेंज दिले आहे. स्वतःच्या इगोमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळीचा बकरा केला गेला. एवढी खुमखुमी होती तर स्वतःच्या घरातला उमेदवार उभा करायचा होता. वसंत देशमुखांना 118 मतं पडली, मोहिते पाटलांच्या घरातला उमेदवार असता तर 118 मतं देखील पडली नसती. अधिवेशन झाल्यावर आता अकलूजमध्ये विजयी सभा घेणार आहे अशी माहिती राजेंद्र राऊत यांनी दिली.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा