• Mon. Jun 29th, 2026
    पुणे जिल्ह्यात 121 ब्लॅकस्पॉट! सर्वाधिक ‘ब्लॅकस्पॉट’ पुणे-सोलापूर महामार्गावर, 46 ठिकाणांची नोंद

    121 Black Spots In Pune District: नुकत्याच झालेल्या रस्ता सुरक्षा बैठकीत विविध प्रशासकीय विभागांमार्फत संयुक्त पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

    ब्लॉकस्पॉट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    पुणे : जिल्ह्यातील महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचा अभ्यास करून १२१ धोकादायक ठिकाणांची (ब्लॅक स्पॉट) यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे-सोलापूर महामार्ग सर्वाधिक धोकादायक असून, मार्गावर सर्वाधिक ४६ धोकादायक ठिकाणे आहेत.

    अपघात रोखण्याचे आव्हान
    या पार्श्वभूमीवर रस्ते सुरक्षा पथकातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करण्याचे, अपघातांची कारणे शोधण्याचे आणि तात्पुरत्या; तसेच कायमस्वरूपी उपाययोजना सुचवण्याच्या सूचना प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी ‘वायुवेग पथकां’ना केल्या आहेत. जिल्ह्यातून महत्त्वाचे महामार्ग जात असून, तेथे सातत्याने अपघात होतात. हे महामार्ग आणि प्रमुख रस्त्यांवर होणारे अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

    Maharashtra TimesPune Crime: पुण्यातील उच्चशिक्षित महिलेला मूत्र प्राशन करण्यास भाग पाडलं; शॉक देऊन अत्याचार, पोलिसांकडून ८ जणांना अटक
    ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणजे काय?
    रस्त्यावर वारंवार अपघात होणारे किंवा ठरावीक कालावधीत मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात घडलेले ठिकाण म्हणजे ब्लॅक स्पॉट होय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निकषांनुसार, एखाद्या ठिकाणी सलग तीन वर्षांत ठरावीक अंतराच्या (साधारणपणे ५०० मीटरच्या) परिसरात किमान पाच गंभीर अपघात होऊन दहा किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला असेल, तर त्या ठिकाणाची ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून नोंद केली जाते.

    नेमके काय करणार?
    -रस्ते सुरक्षा पथकातील अधिकारी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी करणार.
    -पाहणी करून अपघातांची कारणे शोधणार.
    -जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व पथकांना २५ जूनपर्यंत पाहणी पूर्ण करून स्वाक्षरीसह अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. -रस्ते सुरक्षा समितीच्या २९ जूनला होणाऱ्या बैठकीत अहवालावर सविस्तर चर्चा करून तातडीच्या उपाययोजना निश्चित करणार.

    Maharashtra TimesPune Crime : खडकवासल्यात हिरे व्यापाऱ्याचा गूढ अंत, दोन चपलांमुळे पोलिसांना संशय, अखेर पत्नीला कॉल आला अन् मोठा भांडाफोड
    संयुक्त पथके कार्यरत

    अपघातांची अचूक कारणे शोधण्यासाठी परिवहन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, ‘एमएसआरडीसी’; तसेच पोलिस आदी यंत्रणांचे प्रतिनिधी एकत्र येऊन संयुक्त पाहणी करणार आहेत. त्यासाठी आठ रस्ते सुरक्षा पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिस अधिकाऱ्यांसोबत समन्वयाने काम करतील.

    महामार्गनिहाय ब्लॅकस्पॉट
    ४६ -पुणे-सोलापूर महामार्ग
    ३३ -पुणे-अहिल्यानगर
    १३ -पुणे-बेंगळुरू
    २२ -इतर मार्ग
    ७ -पुणे-पंढरपूर (जेजुरी रस्ता)

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा