• Tue. Jun 23rd, 2026
    नाशकात शिंदेसेनेचा गेम, अपक्ष गोकुळ गितेंचा विजयाचा गुलाल; पराभवानंतर शिंदेंची नवी खेळी, एका फोनवर बाजू पालटणार?

    Maharashtra MLC Election Result 2026 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपक्ष गोकुळ गितेंना तातडीने मुंबईला बोलावले असून शिंदेंचा उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाल्याने त्यांच्याकडून नवी खेळी खेळण्यात येत आहे

    गोकुळ गिते(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    जयेश साबळे, नाशिक : संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत अभूतपूर्व निकाल हाती आला आहे. महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना पराभवाचा धक्का बसला असून भाजप बंडखोर अपक्ष उमेदवार गोकुळ गिते यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्याची अधिकृत घोषणा अद्याप बाकी असली तरी विजय निश्चित मानला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सकाळी ८ वाजता सुरु झाल्यानंतर काही वेळातच आकडेवारी समोर आली. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अपक्ष गोकुळ गितेंना तातडीने मुंबईला बोलावण्यात आले आहे. शिंदेंचा उमेदवार नरेंद्र दराडे पराभूत झाल्याने त्यांच्याकडून नवी खेळी खेळण्यात येत आहे. तर गोकुळ गिते हे शिंदेसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

    नाशिक विधान परिषद निवडणूक

    एकूण मतदान – 61
    पैकी 13 अवैध
    605 वैध मते
    विजयाचा कोटा 303

    गोकुळ गिते (अपक्ष) – 357
    नरेंद्र दराडे (महायुती) – 248 (4 टेबलं)

    गोकुळ गिते (अपक्ष उमेदवार) विजयी
    प्रसाद हिरे (भाजप बंडखोर) – 00

    गिते बंधूंची समजूत काढण्याचा प्रयत्न

    नाशिक विधान परिषद निवडणुकीची निवडणूक ही संपूर्ण राजकीय वर्तुळात चांगली चर्चेला आली होती. त्याचं कारण म्हणजे महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना विजय मिळावा यासाठी निवडणूक उमेदवारी अर्ज भरतेवेळी आणि आधीही – महायुतीतील मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे यांच्याकडून गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात आली होती. निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी गोकुळ गिते आणि गणेश गिते या भावांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र गोकुळ गिते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत या निवडणुकीत एक मोठा ट्विस्ट निर्माण केला होता.

    Maharashtra TimesAnjali Damania : सुनेत्रा पवारांच्या सख्ख्या भावाला शिक्षा करण्याची हिंमत सरकारमध्ये आहे का? ओमराजेंना दमानियांचे 6 बोचरे सवाल
    त्यानंतर देखील मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांच्याकडून गिते बंधू यांची मनधरणी करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील गिते बंधू यांच्याशी बैठक संपन्न झाली होती. त्यानंतर गोकुळ गिते यांची मनधरणी करण्यात मंत्री उदय सामंत, मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांच्याकडून मनधरणी करण्यात यश आले होते.

    Girish Mahajan यांचा फोटो व्हायरल, थेट फोटोंचे पुरावे दाखवले, म्हणाले, ‘आमचे कौटुंबिक संबंध’

    प्रचार थांबवला, माघार नाही

    याबाबत अधिकृत पत्रकार परिषद देखील या तिन्ही मंत्री, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे, त्यांचे बंधू आमदार किशोर दराडे आणि गिते बंधू यांनी घेतली होती. त्यानंतर गोकुळ गिते यांनी आपण या निवडणुकीत आपला प्रचार थांबवत असल्याचे जाहीर केले होते परंतु, आपण या निवडणुकीतून माघार घेत आहे किंवा महायुतीचे उमेदवार यांना पाठिंबा देत आहे,असे कुठेही सांगण्यात आले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीत ट्विस्ट हा कायम होता.

    Maharashtra TimesMilind Narvekar : ‘नार्वेकर कोण लागून गेला?’ भास्कर जाधवांचा बोचरा सवाल, ठाकरे गटात धुसफूस, आता मिलिंद नार्वेकरांचं ट्वीट, यांच्या मानसिक त्रासाचा फटका शिवसैनिकांना बसतोय…
    अखेर आज या निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडली असून गोकुळ गिते यांनी मोठ्या फरकाची मते घेत विजयाची दोर ओढून आणली आहे. गिते यांच्या या विजयामुळे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गोकुळ गिते यांची विजयाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं आहे.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा