• Thu. Jun 25th, 2026

    Eknath Shinde : ‘लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल’, ऑपरेशन टायरगच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर

    Eknath Shinde : ‘लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल’, ऑपरेशन टायरगच्या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहा खासदार शिवसेनेत प्रवेश करणार का? असा थेट प्रश्न पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना विचारला. त्यावर एकनाथ शिंदे यांनी सूचक वक्तव्य केलं.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी देवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तर व्हिडीओ जारी करत आपण विकास निधीसाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे. तर खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. तसेच चर्चेतील इतर चार खासदारही शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याचबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल, असं सूचक वक्तव्य केलं.

    विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारकडून आज चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे निमंत्रण सरकारकडून विरोधी पक्षांना देण्यात आलं होतं. पण नेहमीप्रमाणे विरोधी पक्षांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून भूमिका मांडली आहे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. तीनही नेत्यांची चहापानाच्या कार्यक्रमानंतर संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरच्या प्रश्नावर सूचक वक्तव्य केलं.

    “लवकरच तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल. आम्ही ऑपरेशन अर्धवट करत नाहीत, उलथून टाकतो. ते तुम्हाला माहिती आहे, अनुभवही आहे”, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं. “ओमराजे निंबाळकर यांच्याबाबतीत आपण म्हटलं, काल त्यांच्या वडिलांच्या हत्येचा खटला कोर्टात निर्णयासाठी होता. ते स्वत: आणि त्यांचे कुटुंब दु:खात होतं. अशा संवेदनशील परिस्थितीत त्यांना शिवीगाळ करणं, आरोप-प्रत्यारोप करणं, त्यांच्याकडे होते तेव्हा अगदी जमिनीवरचा कार्यकर्ता म्हणणं आणि आता रिलस्टार म्हणून आरोप करत आहेत”, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.

    “सकाळी खासदारांना शिव्या देतात, संध्याकाळी रात्री त्यांच्या घरी जावून गपचूप पाय धरतात. खरं म्हणजे हा केमिकल लोच्या आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, आता ज्या चर्चा सुरु आहेत त्या सर्व खोट्या आहेत. थोडं थांबा, तुम्हाला ब्रेकिंग न्यूज मिळेल”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.

    देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

    यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी देखील मिश्किल प्रतिक्रिया दिली. “ऑपरेशन यशस्वी आहे आणि बॉडी एकदम सुदृढ आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी पत्रकारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. “मी काल एक मिम पाहिला, त्यामध्ये राज ठाकरे शांतपणे झोपले आहेत. त्या मिममध्ये म्हटलं आहे की, मला शांत झोप लागते. कारण माझ्याकडे आमदारही नाहीत आणि खासदारही नाहीत. त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही”, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा