अखेर ओमराजे निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार का? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. ओमराजे यांनी आज धाराशिवमध्ये आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या स्नेहाबद्दलही भाष्य केलं.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
धाराशिव : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज आपल्या मतदारसंघात जावून कार्यकर्त्यांशी चर्चा केली. ओमराजे निंबाळकर यांनी जवळपास दोन ते तीन तास कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांसमोर येऊन भूमिका मांडली. ओमराजे निंबाळकर यांनी अखेर आपला निर्णय जाहीर केला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत आपण प्रवेश करणार असल्याचं ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केलं. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या कार्यकर्त्यांना यश मिळालं नाही, यासोबत मतदारसंघातील विकासकामे आणि वडिलांच्या खुनाचा खटल्याच्या प्रकरणात न्याय मिळावा, अशा विविध कारणांमुळे आपण सत्तेत जाण्याचा निर्णय घेतल्याचं ओमराजेंनी जाहीर केलं. यावेळी ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव घेणं विसरले नाहीत.
“नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धाराशिवमध्ये सगळे कार्यकर्ते लढले. पण एकाही पंचायत समितीत, नगरपालिकेत आम्हाला यश मिळू शकलं नाही. अतिशय चांगलं काम करणारे कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीत वाईट पद्धतीने पराभूत झाले. मी असेन, आमचे सहकारी असतील, आम्ही 24 तास सर्वसामान्यांना वेळ देण्याचं काम केलं आहे. याचे सर्वसामान्य माणसं साक्षीदार आहेत. आम्ही कधी कामात कमी पडलो नाहीत. पण दुर्दैवाने सत्तेत नसल्यामुळे या पराभवाला सामोरं जावं लागलं. आज सगळ्यांच्या माध्यमातून निर्णय घेतला आहे की, शिवसेना पक्षात आम्ही जाणार आहोत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्ही काम करणार आहोत”, असं ओमराजे निंबाळकर यांनी जाहीर केलं.
“या पाठिमागची पार्श्वभूमी आहे. ज्या कारणाने मी माझं सार्वजनिक आयुष्य सुरु केलं. वाईट वृत्तीची लोकं कुठल्याही पद्धतीने राजकाराच्या पटलावर राहायला नको. २० वर्षे अविरतपणे न्यायालयीन प्रक्रिया चालली. आम्हाला या निकालाकडे फार मोठ्या अपेक्षा होत्या. राजकीय वैमनस्य होतं हे न्यायालय मान्य करत आहे. पण दुर्दैवाने कळंबोली पोलीस ठाण्याच्या तपासाला बेस करुन निकाल अतिशय दुर्दैवी होता. अशा पद्धतीने या निकालाचं दु:ख आमच्या कुटुंबाला सहन करावं लागलं”, असं ओमराजे म्हणाले.
“यामध्ये एक माणूस सक्षमपणे उभा होता, त्यांनाही ते पटलेलं नव्हतं. काल ज्या पद्धतीने निकाल आला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बोलणं झालं. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही माझं बोलणं करुन दिलं. आम्ही त्यांना इतकीच विनंती केली की, आम्ही जो संघर्ष करतोय, फक्त न्याय मागतोय. तो न्याय मिळवून द्या अशी विनंती केली. एकनाथ शिंदेंनी स्वत: समोर येऊन भूमिका मांडली. केसच्या मेरिटवर न्याय मिळावा. कुठलाही पक्ष असला तरी अशा वृत्तीला रोखण्यासाठी ओमराजेला कोणीही रोखू शकत नाही”, अशी भूमिका ओमराजेंनी मांडली.
ओमराजेंची उद्धव ठाकरे यांच्याबद्दल भावनिक प्रतिक्रिया
“आदरणीय उद्धवजी, आदरणीय आदित्यजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मला प्रचंड स्नेह लाभला. त्यांचा आशीर्वाद लाभला. त्यांचे प्रेम लाभले आहे. मला वाटतं, माझ्या मनात, माझ्या मनात कधीही कुणाबद्दलही वाईट शब्द आलेले नाहीत आणि येणारही नाहीत. मी मगाशी आमच्या सर्व सैनिकांना सांगितलं की, समोरुन कशीही कमेंट आली तरी ‘मातोश्री’बद्दल आपल्याकडून एकही शब्द जायला नको, अशी विनंती मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना केलेली आहे. मी त्यांचे आभार व्यक्त करतो”, अशी भावना ओमराजे निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केली.
“माझा पुढचा राजकीय प्रवास हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण आणण्यासाठी, त्याला सुखाचे क्षण देण्यासाठी कायम स्वरुपी, जसा याआधी अविरतपणे काम करत आलो आहे, त्याच पद्धतीने काम करत राहीन हे वचन देतो”, असं ओमराजे निंबाळकर म्हणाले.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा