Shiv sena Split News: सहा खासदारांच्या बंडानंतर ठाकरे गटात आणखी एका खासदाराची चर्चा होते आहे, जो ठाकरेंना सोडून जाणार आहे, शिंदे गटाच्या मोठ्या नेत्याने हा दावा केला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटातील सहा खासदारांच्या बंडामुळे निर्माण झालेली राजकीय खळबळ अद्याप थांबलेली नसतानाच आता आणखी एका दाव्याने चर्चांना नवे वळण मिळाले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू रामदास कदम यांनी ठाकरे गटातील आणखी एक खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे सहा खासदारांवरील चर्चा सुरू असतानाच ‘सातवा खासदार कोण?’ हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना रामदास कदमांनी ठाकरे गटाचा सातवा खासदारही नाराज असल्याचा दावा केला. संबंधित खासदार मंत्रिपदासाठी आग्रही होता, असेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आधीच पक्षांतर्गत घडामोडींमुळे चर्चेत असलेल्या ठाकरे गटाला आजच म्हणजे शिवसेना वर्धापनदिनीच हा धक्का मिळणार का याकडे लक्ष लागलं आहे.
गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या खासदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला मोजकेच खासदार प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा खासदारांची बैठक घेण्यात आली. पक्षाने व्हीपही जारी केला होता. तरीही सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने पक्षातील नाराजी उघडपणे समोर आल्याची चर्चा रंगली. बंड केलेले सहा खासदार आज रोजी म्हणजे वर्धापन दिनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करू शकतात, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी पुढील काही तासांत काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Mumbai News : गोवंडीतल्या बालरुग्णालयात नेमकं काय सुरु होतं? FDAच्या छाप्यानंतर उघड झालं धक्कादायक सत्य
२५ नगरसेवकही संपर्कात
रामदास कदम यांनी आणखी एक मोठा दावा करत ठाकरे गटाचे मुंबईतील २५ नगरसेवक संपर्कात असल्याचे म्हटले आहे. एवढेच नव्हे तर आगामी काळात ठाकरे गटातील आणखी नेते आणि पदाधिकारी शिंदे गटाच्या संपर्कात येतील, असे संकेतही त्यांनी दिले.
उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष
आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने उद्धव ठाकरे आपल्या भाषणातून या घडामोडींवर काय भूमिका मांडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सहा खासदारांच्या बंडानंतर पक्षाची पुढील रणनीती काय असेल, कथित सातव्या खासदाराबाबत काही भाष्य होणार का आणि शिंदे गटाकडून होत असलेल्या दाव्यांना ठाकरे कसे उत्तर देणार, याची उत्सुकता वाढली आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा