• Sun. Sep 20th, 2026

Western Railway Update: पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठी अपडेट! 84 लोकलचा थांबा रद्द, गणपती विसर्जनाची गर्दी विभागण्यासाठी निर्णय, कसे आहे नियोजन?

Western Railway Update: ३७ जलद लोकल सर्व स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी १२ विशेष धीम्या फेऱ्या चालवण्यात येणार आहे.

(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
मुंबई : गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीसह परिसरात होणारी गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने लोकल वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. विसर्जनाच्या दिवशी ८४ लोकल फेऱ्यांचा पूर्वनियोजित चर्नी रोड स्थानकाचा थांबा रद्द करण्यात आला आहे.

शुक्रवारी, २५ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गिरगाव चौपाटीवर मोठ्या संख्येने गणेशभक्त विसर्जनासाठी येण्याची शक्यता आहे. विसर्जनाच्या रात्री उशिरा घरी परतणाऱ्या आणि रात्री उशिरा चौपाटीवर जाणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी चर्चगेट ते विरारदरम्यान विरार ते चर्चगेटदरम्यान प्रत्येकी सहा लोकल फेऱ्या घोषित करण्यात आल्या आहेत.

Maharashtra TimesMumbai News: मुंबईत उंच झोपड्यांवर हातोडा; चौदा फुटांवरील 34 हजार बांधकामांवर होणार कारवाई, BMCचा मोठा निर्णयविसर्जनाच्या संध्याकाळी सायंकाळी ६ ते रात्री ११.३० या कालावधीत चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या ८४ अप धीम्या लोकल चर्नी रोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर थांबणार नाहीत. फलाट क्रमांक २ आणि ३ वरील गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या कालावधीत मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ३७ जलद १२ डब्यांच्या लोकलना सर्व स्थानकांवर, चर्नी रोडसह, थांबा देण्यात येणार आहे. त्यामुळे या लोकल या कालावधीत धीम्या लोकलप्रमाणे धावतील.

काही १५ डब्यांच्या लोकलना ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरिन लाइन्स स्थानकांवर थांबा दिला जाणार नाही. विसर्जन मिरवणुकीदरम्यान रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन गर्दी विभागण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra TimesMumbai Kalachowki : बाप्पाच्या दर्शनाला गर्दी, मुंबईतील काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर आक्रित घडलं; विजेचा धक्का लागल्यानं चिमुकलीचा करुण अंतरेल्वे स्थानकात प्रवाशाला लुटले

रेल्वेस्थानकाच्या आवारात चोरट्यांनी प्रवासी तरुणाला धमकावून त्याच्या खिशातील तीन हजार रुपये काढून घेऊन पोबारा केला. बंडगार्डन पोलिसांनी तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत इरफान निजाम महंमद (वय २७, सध्या रा. सुपा, ता. बारामती) याने बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. इरफान मूळचा तेलंगणातील निजामाबादचा रहिवासी आहे. तो शुक्रवारी सकाळी रेल्वेस्थानकाच्या आवारातील पार्सल कार्यालयाजवळ असलेल्या झाडाखाली आराम करीत होता. त्या वेळी तीन चोरटे तेथे आले. ‘आमच्याकडे रागाने का बघतो’ अशी विचारणा करून चोरट्यांनी इरफानला मारहाण केली. त्याच्या खिशातील तीन हजारांची रोकड लुटून चोरटे पसार झाले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा