Nashik Shirdi Railway Line : नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गासाठी हालचालींना वेग आला आहे. यासाठी नाशिक जिल्ह्यातील ३४ गावांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया होणार आहे.
नाशिक शिर्डी रेल्वेमार्ग भूसंपादन प्रक्रिया(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : नाशिकरोड-साईनगर शिर्डी दुहेरी रेल्वेमार्ग प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला अखेर गती मिळाली असून, जिल्हा प्रशासनाने सक्षम प्राधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण ३४ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार असून, त्यामध्ये सिन्नर तालुक्यातील २३ आणि नाशिक तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. सोमवारनंतर संपादित होणाऱ्या गट क्रमांकांची यादी प्रसिद्ध होणार असल्याने संबंधित शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील प्रक्रियेकडे लागले आहे. तसेच आपल्याला मोबदला किती मिळणार? यावरही शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार भूसंपादनाची कार्यवाही
मध्य रेल्वेकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार रेल्वे अधिनियम १९८९ (सुधारित २००८) आणि केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार भूसंपादनाची कार्यवाही करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन शाखेने यासंदर्भातील आदेश जारी केले असून, सिन्नर तालुक्यातील गावांची जबाबदारी निफाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडे, तर नाशिक तालुक्यातील गावांची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्र. १) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. दरम्यान, प्रस्तावित रेल्वेमार्गाची अंतिम लांबी, स्थानकांची संख्या अथवा त्यांची ठिकाणे याबाबतची माहिती अद्याप उपलब्ध नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या यंत्रणेमार्फत मार्गाचे आरेखन पूर्ण झाले असून, काही ठिकाणी फेरसर्वेक्षणानंतर किरकोळ बदल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. Mumbai Monorail : मोनोरेलला झालेले नुकसान प्रवाशांकडूनच वसूल करणार! सुरुवात होणार पण भाडेवाढ अटळ
कोणत्या गावांचा समावेश?
प्रस्तावित रेल्वेमार्गासाठी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी, वडझिरे, दातली, पाथरे खुर्द, दुसुंगवाडी, खोपडी खुर्द, पांगरी खुर्द, मलढोण, खंबाळे, कुंदेवाडी माजरे, सिन्नर, फुलेनगर, ब्राह्मणवाडे, मुसळगाव, देशवंडी, जायगाव, पांगरी बु., वावी, सायाळे, पाटपिंप्री, बारागावपिंप्री, भोकणी आणि सुंदरपूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच नाशिक तालुक्यातील विहितगाव, बेलतगव्हाण, चांदगिरी, जाखोरी, देवळाली, चेहडी बु., संसरी, मोहगाव, बाभळेश्वर, पंचक आणि चाडेगाव या गावांमधूनही रेल्वेमार्ग जाणार आहे. Pune Crime : खडकवासल्यात हिरे व्यापाऱ्याचा गूढ अंत, दोन चपलांमुळे पोलिसांना संशय, अखेर पत्नीला कॉल आला अन् मोठा भांडाफोड
गट क्रमांक जाहीर झाल्यानंतर भूसंपादन
उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांता मंगरुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार रेडीरेकनर दराच्या आधारे शेतकऱ्यांना मोबादला दिला जाईल. रेल्वे अधिनियांतर्गत ही प्रक्रिया अल्प कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून, संबंधित गट क्रमांक जाहीर होताच प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात केली जाणार आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा