Shivsena Split: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार पक्षांतर करण्याच्या चर्चेवर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
ओमराजेंचा चकवा, श्रीकांत शिंदेंच्या नावाने बुक असलेल्या विमानाने पुण्यातून दिल्लीला रवाना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदारांच्या पक्षांतराच्या प्रक्रियेला वेग आला असून लवकरच नऊपैकी किमान सहा खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरेंची साथ सोडण्याची शक्यता असलेल्या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याही नावाचा समावेश असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेत पहिली फूट पडली तेव्हा ओमराजे निंबाळकर यांनी ठामपणे उद्धव ठाकरेंची साथ देत बंडखोर आमदार-खासदारांचा समाचार घेतला होता. तसंच लोकसभा निवडणुकीदरम्यान पैशापेक्षा निष्ठेला किंमत असल्याचं सांगत आपण कायम ठाकरेंसोबत राहणार असल्याचं निंबाळकर यांनी जाहीर सभांतून सांगितलं होतं. मात्र आता त्यांच्याही पक्षांतराची चर्चा होऊ लागली असून मध्यरात्री १ वाजता पुणे विमानतळावरून ते दिल्लीला रवाना झाल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाने पुणे विमानतळावर दोन विमाने बुक करण्यात आली होती. खरंतर काल दुपारीच यातील एका विमानाने ओमराजे निंबाळकर दिल्लीला रवाना होणार होते. मात्र नंतर या प्लॅनमध्ये बदल करण्यात आला आणि मध्यरात्री १ वाजता गुप्तपणे ते दिल्लीकडे रवाना झाले. खासदार निंबाळकर यांच्यासह महायुतीचे इतरही काही नेते त्यांच्यासोबत होते, असंही समजते.
दरम्यान, पक्षफुटीची चर्चा सुरू झाल्यानंतर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहे, असा दावा नुकताच ओमराजे निंबाळकर यांनी केला होता. मात्र आता ते दिल्लीसाठी रवाना झाल्याने त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेतील प्रवेश निश्चित मानला जात आहे.
पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल २० जूनला?
एकीकडे ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू असताना दुसरीकडे त्यांचे वडील आणि काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्यासह चालक समद काझी यांची नवी मुंबईतील कळंबोली येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याच्या तब्बल दोन दशकांपूर्वीच्या प्रकरणाचा निकाल येत्या २० जून रोजी लागण्याची शक्यता आहे. या प्रकरणात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह १२८ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. निकाल लेखन पूर्ण करण्यासाठी आणखी दोन-दिवसांची आवश्यकता आहे, असे विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण नवंदर यांनी मंगळवारी स्पष्ट केले आणि पुढील सुनावणी २० जून रोजी ठेवली. त्यामुळे त्यादिवशी निकाल येणे अपेक्षित आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांनी राजकीय व व्यावसायिक वैरातून त्यांचे चुलत बंधू पवनराजे यांच्या हत्येचा कट रचला आणि त्यानंतर दोन हल्लेखोरांना सुपारी देऊन ३ जून २००६ रोजी हत्या घडवून आणली, असा आरोप सीबीआयने ठेवला आहे. पाटील यांच्यासह आठ आरोपींविरोधात हा खटला चालला. अन्य आरोपींमध्ये लातूरचे व्यावसायिक सतीश मंदाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निवृत्त निरीक्षक मोहन शुक्ला तसेच गोळीबार करणाऱ्या दोन मारेकऱ्यांचा समावेश आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा