• Fri. Sep 11th, 2026

‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी उपसंचालक नामदेव परीट यांचे मार्गदर्शन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Jun 16, 2026
‘दिलखुलास’ कार्यक्रमात कृषी उपसंचालक नामदेव परीट यांचे मार्गदर्शन – महासंवाद

मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांची ‘खरीप हंगाम विशेष’ मुलाखत प्रसारित होणार आहे. यामध्ये खरीप हंगामाची पूर्वतयारी, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन, प्रमाणित बियाण्यांची निवड, संतुलित खत व्यवस्थापन, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांविषयी ते सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.

‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत गुरुवार, १८ जून आणि शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरुन प्रसारित होणार आहे. तसेच हा कार्यक्रम ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरही ऐकता येणार आहे. ही मुलाखत कोल्हापूर विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक वृषाली पाटील यांनी घेतली आहे. खरीप हंगामात अधिक उत्पादन आणि शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींना प्राधान्य द्यावे, याबाबतही परीट मार्गदर्शन करणार आहेत. तसेच प्रमुख पिकांच्या लागवडीवेळी घ्यावयाची काळजी आणि हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहितीही या मुलाखतीतून दिली जाणार आहे.

मुलाखतीमध्ये यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींवर विशेष भर द्यावा तसेच हवामान बदलाच्या आव्हानांमध्ये शाश्वत शेतीसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत श्री.परीट यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून मार्गदर्शन केले आहे.

००००

जयश्री कोल्हे/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *