Amruta Fadnavis on Sunetra Pawar : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ या शब्दाचा वापर केल्यावरुन सर्वच स्तरावरुन संताप व्यक्त करण्यात आला. ‘काँग्रेसने चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागायला पाहिजे,’ अशी प्रतिक्रिया मिसेस मुख्यमंत्री अमृता देवेंद्र फडणवीस यांनी दिली
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी यांसारख्या महिलांनी आपल्या कर्तृत्वाने देशासाठी मोठे योगदान दिले. आजच्या काळातही अशा महिलांची गरज आहे. बालविकास व महिला सक्षमीकरणासाठी समाजाच्या प्रत्येक घटकाने योगदान द्यायला हवे,’ असे प्रतिपादन दिव्यज फाउंडेशनच्या संस्थापिका आणि मिसेस मुख्यमंत्री अमृता देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसने ‘गुंगी गुडिया’ शब्दाचा वापर करणे चुकीचे आहे. काँग्रेसने चुकीच्या शब्दाबद्दल माफी मागायला पाहिजे,’ असेही अमृता फडणवीस म्हणाल्या.
‘ग्रॅव्हिटस फाउंडेशन’तर्फे जेडब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित ऊर्जा पुरस्कार वितरण सोहळ्यात अमृता फडणवीस बोलत होत्या. या वेळी डॉ. शां. ब. मुजुमदार यांना ‘ऊर्जा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याशिवाय, डॉ. संजय गुप्ते, सुलज्जा फिरोदिया मोटवानी, तिलक वर्मा, प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे, अण्णाराव राजमाने यांना गौरविण्यात आले. उरी हल्ल्यातील हुतात्मा अर्जुन जाधव यांच्या स्मरणार्थ वीरपत्नी सायली आणि त्यांच्या पालकांना शौर्य पुरस्काराने, तर माळशिरसमध्ये पाच जणांचा जीव वाचवणाऱ्या इरफान मुजावर यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी ‘ग्रॅव्हिटस’च्या संस्थापिका उषा काकडे, ‘सिम्बायोसिस’च्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, रोहन देशमुख, अभिनेते चंकी पांडे, तेलुगू दिग्दर्शक व्यंकटेश कुडुमुला उपस्थित होते.
काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना ‘गुंगी गुडिया’ असे संबोधल्याने मंगळवारी राज्यात आरोप-प्रत्यारोपांचा आवाज वाढला. राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला. काँग्रेसच्या कुलाबा येथील गांधी भवन या कार्यालयात धडक देऊन, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर पक्षांनीही काँग्रेसच्या या टिप्पणीचा समाचार घेतला. तर, ‘गुंगी गुडिया’ ही शिवी किंवा असंसदीय शब्द नाही, असे सपकाळ यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसने शेअर केलेला व्हिडिओ
पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यावर टीका होऊनही कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून कुठलीही तातडीची प्रतिक्रिया आली नव्हती. मंगळवारी सायंकाळी या दोन्ही नेत्यांनी ‘एक्स’च्या माध्यमातून काँग्रेसचा निषेध केला. बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी पत्रकारांकडून प्रश्न विचारले जात असताना माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना थांबण्याचा इशारा केला. त्यानंतर सुनेत्रा पवार पत्रकार परिषदेतून उठल्या. हा व्हिडीओ ‘एक्स’वरील महाराष्ट्र काँग्रेसच्या अधिकृत अकाऊंटवरून सोमवारी सायंकाळी पोस्ट करण्यात आला. ‘सुनेत्रा पवार अजून किती दिवस ‘गुंगी गुडिया’ बनून राहतील’, अशी टिप्पणी व्हिडीओसोबत करण्यात आली. यावर मंगळवारी जोरदार प्रतिक्रिया उमटल्या.
Sachin Ahir : सुषमा अंधारे चळवळीतील कार्यकर्त्या, पक्ष सोडणार नाहीत, पण ठाकरेंनी योग्य न्याय द्यावा, सचिन अहिरांची अपेक्षा
फडणवीसांचीही नाराजी
राष्ट्रवादी काँग्रेसने या टिप्पणीचा निषेध केला. पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी काही कार्यकर्त्यांसह थेट काँग्रेसचे दादर येथील टिळक भवन गाठत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप करत राष्ट्रवादीच्या सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘राज्याची राजकीय संस्कृती इतक्या खालच्या स्तराला जाताना प्रथमच पाहायला मिळाले’, असे त्यांनी नमूद केले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा