Pune Ring Road: पुण्यातील प्रकल्पांची रखडलेल्या कामांना वेग मिळावा यासाठी एसव्हीपी स्थापन करण्यात येत आहे. यामुळे पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगर पालिका आणि पीएमआरडीएचे अधिकारी मिळून एकाच वेळी प्रकल्पांवर काम करू शकतील.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे शहर आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भुयारी बोगदे , रिंग रोड आणि वर्तुळाकृती उच्च क्षमता द्रुतगती महामार्ग (एचसीएमटीआर) हे ८० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प जलदगतीने साकारण्यासाठी स्वतंत्र ‘स्पेशल पर्पज व्हेइकल’ (एसपीव्ही) स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिका आयुक्त या ‘एसपीव्ही’चे अध्यक्ष असणार असल्याचे समजते.
पाच महिन्यात आराखडा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या एका उच्चस्तरीय आणि महत्त्वपूर्ण बैठकीत या प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. महापालिका, ‘पीएमआरडीए’ आणि पोलिस दलातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या या ‘एसपीव्ही’कडून या तिन्ही प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येणार आहे. भुयारी बोगदे तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती याच महिन्यांत होणार असून, येत्या पाच महिन्यांत सविस्तर प्रकल्प आराखडा आणि व्यवहार्यता अहवाल तयार होतील. या कामांच्या निविदा प्रक्रिया राबवून वर्षअखेरीपर्यंत ही कामे सुरू करण्याचे नियोजन आखण्यात आले असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी व्यक्त केली.
Pune Ring Road: पुणे बाह्य रिंग रोडचं 32 टक्के काम पूर्ण, मंबई, नाशिक, अहिल्यानगरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार; डेडलाइन समोर?
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ५४ किलोमीटर लांबीच्या दुहेरी भूमिगत बोगदा प्रकल्पाचा महत्वाकांक्षी आराखडा तयार केला असून, त्यासाठी ३६,४१५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी ५४.४७ हेक्टर जमीन संपादन करणे अपेक्षित असून, त्यासाठी ३,३१६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ‘मोनार्क सर्व्हेयर्स अँड इंजिनीअरिंग कन्सल्टंसी’ यांनी तयार केलेल्या सादरीकरणात वाहतुकीची सद्यस्थिती, भविष्यात होणारी वाहतूक वाढ, बोगद्याचे पर्याय, आर्थिक व्यवहार्यता आणि निधीची उपलब्धतता यावर सविस्तर विश्लेषण करण्यात आले आहे.
८० हजार कोटींचे प्रकल्प
भुयारी बोगद्यांसाठी ४० हजार कोटी, रिंग रोडसाठी ३० हजार कोटी, तर ‘एचसीएमटीआर’साठी दहा हजार कोटी असे सुमारे ८० हजार कोटी रुपयांचा खर्च या प्रकल्पांसाठी अपेक्षित आहे. या प्रकल्पांसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून प्रत्येकी २० टक्के निधी मिळू शकतो. उर्वरित निधी हा उभारावा लागणार आहे. त्यामुळे हे सर्व प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर राबवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Purandar International Airport: एका महिन्यात ६० टक्के शेतकऱ्यांची संमती, पुरंदरमध्ये भूसंपादनाला वेग; ३,००० एकर क्षेत्रावर उभारणार विमानतळ
‘एचसीएमटीआर’ला नवं संजीवन
शहराच्या १९८७च्या विकास आराखड्यात (डीपी) वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ‘एचसीएमटीआर’चा अंतर्भाव करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जागांचे भूसंपादन करावे लागणार असल्याने हा रस्ता रखडला आहे. या प्रकल्पात काही बदल करून महापालिकेने या प्रकल्पाचा आराखडा राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला राज्य सरकारने मान्यताही दिलेली आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने ५,२०० कोटी रुपयांची निविदा काढली होती. मात्र, ही निविदा ४५ टक्के वाढीव दराने आल्याने महापालिकेने ही निविदा रद्ददेखील केली आहे.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा