• Sat. Jul 25th, 2026
    Mumbai Local Update: विकेंडला मुंबईकरांचे हाल! मध्य, हार्बर रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक; कोणत्या लोकलवर परिणाम? पाहा वेळापत्रक

    Mumbai Local Mega Block Update: ब्लॉक वेळेत रेल्वे रूळांसह सिग्नलची देखभाल दुरुस्ती करण्यात येते. यामुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत.

    मुंबई लोकल मेगाब्लॉक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ठाणे ते कल्याण आणि ठाणे ते वाशी / नेरूळदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीमदरम्यान आज, शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. यामुळे रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही ब्लॉक असणार नाही.

    मध्य रेल्वे
    स्थानक – ठाणे ते कल्याण
    मार्ग – अप आणि डाउन जलद
    वेळ – सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०
    परिणाम – ब्लॉक वेळेत अप आणि डाउन जलद मार्गावरील लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे.काही मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    ट्रान्स हार्बर मार्ग
    स्थानक – ठाणे ते वाशी नेरूळ
    मार्ग – अप आणि डाउन
    वेळ – सकाळी ११.१० ते दुपारी ४.१०
    परिणाम – ब्लॉक वेळेत ठाणे ते वाशी / नेरूळ / पनवेल दरम्यान अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. सीएसएमटी ते वाशी / पनवेल / बेलापूर दरम्यान लोकल फेऱ्या रविवार वेळापत्रकानूसार उपलब्ध राहणार आहेत.

    पश्चिम रेल्वे
    स्थानक – मुंबई सेंट्रल ते माहीम
    मार्ग – अप आणि डाउन जलद
    वेळ – शनिवारी रात्रीनंतर १२.२५ ते रविवारी पहाटे ४.२५
    परिणाम – ब्लॉक वेळेत रात्री उशिरा धावणाऱ्या लोकल फेऱ्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द राहणार असून काही लोकल फेऱ्या २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

    पुलाच्या गर्डरसाठी विशेष ब्लॉक
    मुंबई : मुलुंड स्थानकातील पादचारी पुलाचे गर्डर उभारण्यासाठी शनिवारी रात्रीनंतर १.१० ते रविवार पहाटेपर्यंत ३.४० पर्यंत अप आणि डाउन धीम्या आणि जलद मार्गावर विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घोषित केला आहे. अप आणि डाउन धीम्या मार्गावर मध्यरात्री १.१० ते पहाटे ३.४० आणि अप आणि डाउन जलद मार्गावर मध्यरात्री १.१० ते पहाटे २.१० दरम्यान ब्लॉक असणार आहे. ब्लॉक वेळेत २५ जुलैच्या मध्यरात्रीनंतर धावणारी १२.२४ची सीएसएमटी-ठाणे आणि २६ जुलैला पहाटे ४.०४ची ठाणे-सीएसएमटी लोकल रद्द राहणार आहे

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा