Amalner Dhule Highway Car ST Bus Accident : अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावून त्यांना समोरुन जोरदार धडक दिली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. प्रतिनिधी, जळगाव : जळगाव जिल्ह्यात अमळनेर-धुळे महामार्गावर मंगळवारी सकाळी तिहेरी अपघात झाला. या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. कार, एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी प्रवास करणाऱ्या गुजरात राज्यातील व्यारा येथील कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती आहे.
कारची बस-बाईकला धडक
मंगरूळ गावाजवळ सकाळी साधारण सात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्राथमिक माहितीनुसार, अमळनेरहून धुळ्याकडे जाणारी एसटी बस आणि दुचाकी आपल्या मार्गावरुन प्रवास करत असताना धुळ्याकडून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने नियंत्रण गमावले आणि समोरून जोरदार धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी प्रचंड होती की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील पाच प्रवाशांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे. Plaza BEST Bus Accident : माझ्या भावाचा काय दोष? कुटुंब सावरणाऱ्या 25 वर्षीय नियाजचा बेस्ट बस अपघातात अंत, भावंडांचा बांध फुटला
साखरपुड्याच्या कार्यक्रमाला जाताना अपघात
अपघातग्रस्त कारमधील प्रवासी गुजरात राज्यातील व्यारा येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली असून ते एका कौटुंबिक साखरपुडा समारंभासाठी अमळनेरकडे येत होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.
आपत्कालीन सेवा आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातात कारमध्ये अडकलेल्या एका लहान मुलाला ग्रामस्थ, पोलीस आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आले. या दुर्घटनेत काही जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमधील एका प्रवाशालाही दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. Mumbra Accident : भाऊ रात्री कामावरुन येईल… मुंब्रा लोकल अपघातात राहुलला गमावून एक वर्ष लोटलं, बहिणींच्या नजरा आजही दाराकडे
‘समृद्धी’वर अपघात; एक ठार, तीन जखमी
दुसरीकडे, समृद्धी महामार्गावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवर एक कार आयशर ट्रकला मागून धडकल्याने एक तरुण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचा पुढील भाग ट्रकमध्ये अडकल्याने चालकाने कारला सुमारे दोन ते तीन किलोमीटर फरपटत नेले. मुंबई कॉरिडॉरवरील चॅनेल क्रमांक २७३वर हा अपघात घडला. या अपघातात कारचालकाच्या बाजूला बसलेला कृष्णा राठोड (वय ३०, रा. मानोरा, जि. वाशिम) याचा जागीच मृत्यू झाला, तर राहुल पवार, सत्यपाल राठोड आणि कार्तिक जाधव हेदेखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा