Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टी दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके यांनी याबद्दल अधिकृत माहिती सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे: नीट आणि सीबीएसई परीक्षांमधील कथित गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीने आता महाराष्ट्रात आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील पहिल्या आंदोलनानंतर पक्षाचे पुढील आंदोलन पुण्यात होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील जंतरमंतर येथे झालेल्या पक्षाच्या पहिल्या आंदोलनाला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचा दावा पक्षाकडून करण्यात आला आहे. या आंदोलनात पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके हेही स्वतः उपस्थित होते. विशेष म्हणजे ते शनिवारी सकाळी अमेरिकेतून भारतात परतल्यानंतर थेट विमानतळावरून आंदोलनस्थळी पोहोचले होते.
पुण्यातल्या आंदोलनाची वेळ तारीख
आंदोलनादरम्यान बोलताना दीपके यांनी देशभर विविध ठिकाणी आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला होता. त्यानुसार आता दुसरे आंदोलन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. शैक्षणिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या पुण्यात ११ जून रोजी दुपारी ४ वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात हे आंदोलन होणार आहे.
कोणत्या मागणीसाठी आंदोलन?
या आंदोलनातूनही केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येणार आहे. पक्षाचे सदस्य आणि समर्थकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजीत दीपके यांनी एका पोस्टच्या माध्यामातून केले आहे.
Dadar Plaza Best Bus Accident: लग्नासाठी 17 जूनला गावी जाणार होता; पण त्याआधीच सगळं बिघडलं! दादर बस अपघातात डिलिव्हरी बॉय नियाजचा वेदनादायी शेवट
या आंदोलनाकडे जास्त लक्ष
अभिजीत दीपके हे मूळचे महाराष्ट्रातील असल्याने राज्यातील त्यांच्या पहिल्या आंदोलनाकडे विशेष लक्ष लागले आहे. दिल्लीतील आंदोलनाला ६ ते ७ हजार नागरिक उपस्थित होते, असा दावा त्यांनी रविवारी केला होता. आंदोलनाला अपेक्षित गर्दी झाली नसल्याचा आरोप काही जणांनी केल्यानंतर दीपके यांनी त्याला उत्तरही दिले होते.
परवानगीबद्दल खुलासा नाही
दरम्यान, दिल्लीतील आंदोलनासाठी स्थानिक पोलिसांनी काही तास आधी परवानगी दिली होती. मात्र पुण्यातील प्रस्तावित आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी मिळाली आहे की नाही, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दिल्लीतील आंदोलनासाठी ऐनवेळी परवानगी मागण्यात आल्याने पक्षाच्या कार्यपद्धतीवरही काही स्तरातून टीका झाली होती.
आता पुण्यातील आंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि पक्षाच्या मागण्यांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा