• Fri. Jul 24th, 2026

    पुणे बाह्य रिंग रोडचं 32 टक्के काम पूर्ण, मंबई, नाशिक, अहिल्यानगरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार; डेडलाइन समोर?

    पुणे बाह्य रिंग रोडचं 32 टक्के काम पूर्ण, मंबई, नाशिक, अहिल्यानगरला जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार; डेडलाइन समोर?

    Pune Outer Ring Road: पुण्यात वाहतूककोंडी फोडण्यासाठी दोन रिंग रोडचं काम सुरू आहे. बाह्य रिंगरोडने माहमार्गावरील वाहतूक शहाराबाहेर वळवण्यात येणार आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचं काम वेगाने सुरू असून 32 टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या रिंग रोडचं काम सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक शहरापासून बाहेर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मार्गांवरील वाहतूककोंडी फुटणार आहे. तसेच, महामार्गावरील वाहनं शहरातील कोंडी बायपास करून थेट प्रवास करू शकणार आहेत.

    कधी होणार काम पूर्ण?

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या मार्गाचा पश्चिमेकडील भागाचं काम 2027अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर या मार्गाच्या बांधकामाला वेग मिळाला. त्यामुळे प्रकल्पाच्या अनेक भागांवरील काम आता युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. MSRDC या सर्व कामावर लक्ष ठेवून आहे. दिलेल्या डेडलाइनपूर्वी काम पूर्ण करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. पश्चिमेकडील भाग 2027मध्ये तर पूर्वेकडील बाग 2028मध्ये पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.

    Maharashtra TimesPurandar International Airport: एका महिन्यात ६० टक्के शेतकऱ्यांची संमती, पुरंदरमध्ये भूसंपादनाला वेग; ३,००० एकर क्षेत्रावर उभारणार विमानतळ

    रिंग रोडच्या बांधकामावेळी गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही याची खात्री घेतली जाईल. प्रत्येक टप्प्यावर काम दर्जेदार बांधकामाला सर्वोच्च प्राधान्य दिलं जाणार आहे. प्रकल्प पूर्ण होताच पुणेकरांची वाहतूककोंडीतून सुटका होणार आहे. प्रवास अधिक जलद आणि सुरक्षित होण्याची अपेक्षा आहे.

    173 किमी लांब मार्ग

    पुणे रिंग रोडचा मार्ग 173 किमी लांब आहे. 2007मध्ये पहिल्यांदा या रिंग रोडची योजना आखण्यात आली होती. शहरासह शहराबाहेरील परिसरांना जोडण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. प्रवासात वेळ वाचल्यामुळे शहरातील प्रदूषण तब्बल 25 टक्क्यांनी कमी होणार आहे. सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना पुणे शहराअंतर्गत प्रवास करावा लागतो. यामुळे शहरात कोंडी वाढते आणि प्रदूषणही वाढतं. त्यामुळे तब्बल 1555 भुखंडावर हा रिंग रोड उभारण्यात येत आहे.

    Maharashtra TimesPune Traffic: पुण्यातील वाहतूक कोंडी होणार दूर! ‘एआय’ लावणार शहराच्या वाहतुकीला शिस्त, कसा आहे प्लॅन?

    पुणे रिंग रोडच्या पूर्वेकडील काम 12 पॅकेजेसमध्ये सुरू आहे. यापैकी 9 वरती काम सुरू झालं असून 3 पॅकेजेसना मेमध्ये मंजुरी मिळाली असून ऑक्टोबरपर्यंत काम सुरू होणार आहे. खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, सिंहगड, उर्से आणि सोरतापवादीमध्ये काम सुरू झालं आहे. या प्रकल्पाला 30 महिन्यांची डेडलाइन दिली असून कोणताही विलंब झाल्यां कंत्राटदाराला दंड ठोठावला जाईल.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा