• Sat. Sep 12th, 2026

Prathamesh Deshmukh : ‘त्याला चहाचंही व्यसन नाही, पोलीस अधिकारी बदला’; प्रथमेश देशमुख प्रकरणात कुटुंबीयांचा संताप, पुणे पोलिसांचा दावा फेटाळला

Dharashiv Prathamesh Deshmukh Suicide Case : ऑनलाइन गेमिंग अन् बेटिंगच्या विळख्यात अडकून एमपीएससीची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख याने आयुष्य संपवलं, असा दावा पुणे पोलिसांनी केला आहे. मात्र, पोलिसांचा दावा कुटुंबियांनी फेटाळून लावला.

धाराशिव प्रथमेश देशमुख आत्महत्या प्रकरण(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रहीम शेख, धाराशिव : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रथमेश देशमुख (वय 28) या तरुणाने दोन दिवसांपूर्वी पुण्यातील नारायणपेठ परिसरात गळफास घेत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरवातीला आर्थिक विवंचनेतून त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती पुढे आली आहे. प्रथमेशने ऑनलाइन गेमिंग आणि बेटिंगच्या विळख्यात अडकून त्याने स्वतःचं आयुष्य संपवल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांना चिठ्ठी सापडली

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील खासापुरी येथील एमपीएससी परीक्षेची तयारी करत असलेल्या प्रथमेश देशमुखयाने पुण्यात आर्थिक अडचणी आणि मानसिक तणावामुळे आपले जीवन संपवले. पुण्यात राहून तो गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. देशमुख कुटुंबावर काही लाखांचे कर्ज होते. शेतीचे नुकसान, परीक्षांचे पेपर सतत पुढे ढकलणे, अशा गोष्टींमुळे प्रथमेश चिंतेत होता. त्याच नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची चर्चा होती. प्रथमेशच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करताना पुणे पोलिसांच्या हाताला त्याने लिहिलेली चिठ्ठी लागली आहे. या चिठ्ठीत कुणाकडून किती पैसे घेतले होते आणि कोणत्या कारणासाठी पैसे घेतले होते, याचा हिशेब त्याने लिहिला होता. याच चिठ्ठीवरून त्याने ऑनलाइन गेमिंगसाठी कर्ज घेतले होते, अशा निष्कर्षापर्यंत पुणे पोलीस पोहोचले आहेत.

Maharashtra TimesPune Crime : ऑनलाइन गेमिंग अन् बेटिंगच्या विळख्यात अडकून आयुष्य संपवलं, पुण्यातील MPSC करणाऱ्या प्रथमेश देशमुख प्रकरणात नवीन माहिती

पोलिसांच्या दाव्यावर कुटुंबियांचा संताप, आरोप फेटाळले

‘प्रथमेश देशमुख याला चहाचं सुद्धा व्यसन नव्हतं. मग तो ऑनलाइन गेमिंग बॅटिंग खेळलास कसा? एकदम साधा मुलगा की, त्याला अधिकारी व्हायचं होतं. ते स्वप्न घेऊन तो पुण्यात गेला होता. आम्हाला तर तो व्यसन करणाऱ्यांपैकी कधीच दिसला नाही. 15 दिवसांपूर्वी तो गावी आला होता. त्याने शेताकडे फेरफटका मारला, वाळलेली पिके पाहिली आणि नाराज झाला. गेल्यावर्षी अतिवृष्टीमध्ये त्याची जमीन खरडून गेली होती, आणि यावर्षी पाऊस नसल्यानं पिके वाळून गेली होती, त्याचं दुःख त्याला होतं’, असं प्रथमेशच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे.

‘तपास अधिकारी बदला’

‘पेपरफुटी बाबत एमपीएससी मुलांचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये तो होता. रात्री बारापर्यंत तो त्यांच्या मित्राशी बोलत होता. त्याच्या रूममध्ये कोणीच नसल्यानं त्यानं टोकाचा निर्णय घेतला. तपास करणारे पोलीस अधिकारी आहेत, त्यांच्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांना बदला व त्यांच्याऐवजी दुसरे प्रामाणिक अधिकारी द्या, म्हणजे ते तपास प्रामाणिक करतील’, असं म्हणत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा