• Fri. Jun 5th, 2026
    Mumbai Fraud: 45 मिनिटांत पैसे चौपट; बँक अधिकारी जाहिरातीला भुलला, 3 लाखांचा गंडा, काय घडलं नेमकं?

    Mumbai Fraud Case: रक्कम गुंतवा आणि ४५ मिनिटांत चौपट मिळवा, बँक अधिकारी जाहिरातीला भुलला अन् ३ लाख गमावले. काय प्रकरण?

    मुंबई क्राईम बातम्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : गुंतवणुकीचे धडे आणि परताव्याचे गणित जाणणारा अधिकारीच जास्त पैसे कमविण्याच्या मोहात अडकल्याचे मालाडच्या कुरार व्हिलेज मधील एका घटनेतून समोर आले आहे.

    ‘रक्कम गुंतवा आणि ४५ मिनिटांत चौपट मिळवा’ अशी जाहिरात बँक अधिकाऱ्याच्या नजरेस पडली आणि त्याला मोह आवरला नाही. गुंतवणुकीची रक्कम पाच हजारांपासून तीन लाखांपर्यंत रक्कम कधी पोहोचली, हे त्याला कळलेच नाही. नंतर मात्र डोळे उघडले आणि आपण फसत आहोत, याची जाणीव बँक अधिकाऱ्याला झाली.

    Maharashtra TimesIllegal Gender Detection Racket: ‘गर्भलिंग’ रॅकेटमागे एकच सूत्रधार; तीन जिल्ह्यांतील कारवायांत नरेंद्र ठाकरेचे नाव समोर
    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुरार व्हिलेज परिसरात वास्तव्यास असलेला २८ वर्षीय राकेश हा एका अग्रगण्य बँकेत अधिकारी पदावर कार्यरत आहे. २५ मे रोजी रात्रीच्या सुमारास रिया ठाकूर नावाच्या तरुणीकडून राकेशला टेलिग्रामवर एक संदेश आला. ‘कितीही रक्कम गुंतवा आणि ४५ मिनिटांत चार पटीने पैसे परत मिळवा’, असे या संदेशात नमूद करण्यात आले होते. या संदेशातील लिंकवर क्लिक करताच एका क्रमांकाचे व्हॉट्सॲप सुरू झाले. राकेशने या योजनेबाबत विचारले असता, समोरील व्यक्तीने पाच हजार गुंतविल्यास ४५ मिनिटांत २० हजार रुपये मिळतील, असे सांगितले आणि एक स्कॅनर पाठवला. राकेशने त्या स्कॅनरवर पाच हजार रुपये पाठविले आणि ४५ मिनिटे वाट पाहिली. दिलेला कालावधी संपला तरी पैसे न मिळाल्याने राकेश याने समोरील व्यक्तीला फोन केला असता, आता रात्रीची वेळ असल्याने सर्व्हर डाऊन आहे, उद्या सकाळी पैसे मिळतील असे सांगण्यात आले.

    Maharashtra TimesMumbai Watermelon Deaths : ना चमचे-प्लेट, ना बिर्याणी, ना उंदीरनाशक; कशातही झिंक फॉस्फाईड नाही, डोकाडिया मृत्यू प्रकरणी पोलिसांसमोर चार नवे अँगल
    दुसऱ्या दिवशी सकाळी रिया ठाकूर हिचा संदेश आला की तुमची २० हजार ही रक्कम वाढून आता ६९,००० रुपये झाली आहे. ही रक्कम मिळविण्यासाठी तुम्हाला १२,५२१ रुपये भरावे लागतील. राकेश याने ही रक्कमही पाठवली. त्यानंतर पुन्हा अन्य एका व्यक्तीने संदेश पाठवला की रक्कम आणखी वाढली आहे, कर भरल्याशिवाय पैसे मिळणार नाहीत. समोरील व्यक्ती वेगवेगळी कारणे सांगू लागली आणि त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवत राकेश पैसे पाठवत राहिला. सुमारे तीन लाख पाठविल्यानंतरही वेगवेगळी कारणे पुढे करून पैसे मागितले जात असल्याने आपण फसल्याचे राकेश यांना कळून चुकले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा