Nashik Who is Gokul Gite? : विधान परिषद निवडणुकीत नाशिक मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढली आहे. कारण बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी शेवटच्या दिवशीही अर्ज मागे घेण्यास नकार दिला असल्यानं निवडणूक बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
नाशिक गोकुळ गीते निवडणूक माघार नाही(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नाशिक : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज निवडणुकीतून माघार घेण्याचा अखेरचा दिवस होता. त्याचदरम्यान, नाशिक विधान परिषद निवडणुकीत अत्यंत वेगवान घडामोडी पाहायला मिळाल्या. महायुतीमधील बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीला अखेर यश आले असून, माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयानंतर त्यांचे बंधू गोकुळ गीते हे आक्रमक झाले असून, ते अपक्ष निवडणूक लढण्यावर ठाम असल्यानं महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील पेच कायम आहे.
गोकुळ गीते नेमके कोण?
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गणेश गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवली होती. या संपूर्ण निवडणुकीचं नियोजन आणि कॅम्पेन गोकुळ गीते यांनीच सांभाळलं होतं. MLC Election : जळगावमध्ये शिवसेनेच्या रेश्मा काळे यांची बंडखोरी, भाजपचं टेन्शन वाढणार, चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार? गोकुळ गीते हे पिंपळगाव बाजार समितीवर सलग दोनवेळा संचालक म्हणून निवडून आले आहेत, तर सध्या त्यांची सायखेडा गटातून जिल्हा परिषद निवडणुकीची पूर्वतयारी सुरू आहे. स्थानिक पातळीवर त्यांची मोठी ताकद मानली जाते.
गोकुळ गीते हे नाशिकचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचे भाऊ आहेत.
गणेश गीते यांच्या संपूर्ण राजकीय वाटचालीत बंधू गोकुळ गीते यांचा पडद्यामागून मोठी मदत राहिली आहे. Ahilyanagar MLC Election : ‘मी माघार घेतलीच नाही, अन्याय झाल्यास…’; अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरेंचा गंभीर आरोप, अहिल्यानगरमध्येही हायव्होल्टेज ड्रामा
वडिलांच्या नावाच्या एकेरी उल्लेख
महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या मुलाच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये गोकुळ गीते यांच्या वडिलांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याने गोकुळ गीते यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्याची चर्चा नाशिक शहरात रंगली आहे. हा अर्ज मागे न घेण्यात आल्यानं नाशिकमध्ये गोकुळ गीते विरुद्ध नरेंद्र दराडे अशी लढत रंगणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. कथित ऑडिओ क्लिपनुसार, महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे पुत्र कुणाल दराडे यांनी गीते यांच्या वडिलांचा एकेरी उल्लेख केल्यानं ही गोष्ट गीते यांच्या जिव्हारी लागल्याची चर्चा आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा