• Sat. Sep 5th, 2026
दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज पाहा एका क्लिकवर


Live News in Marathi: विधान परिषदेच्या 17 जागांसाठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत बुधवारी राज्यभरात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यवतमाळ मतदारसंघात महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी अचानक माघार घेतली. सोलापूरमध्ये काँग्रेस उमेदवाराचे सूचक असलेले पंढरपूरचे नगरसेवक नागेश भोसले यांनी हरकत घेऊन सूचक म्हणून आपली सही नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याने काँग्रेसचा अर्ज बाद झाला. दरम्यान, मे महिन्यामध्ये देशात दाखल होण्याची अपेक्षा असलेला मान्सून अखेर देशाच्या उंबऱ्यापाशी येऊन उभा राहिला आहे. केरळमध्ये आज, गुरुवारी मान्सून दाखल होऊ शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed