• Sun. Jun 7th, 2026
    Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बंधूं’ना दणका! लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारे 14 हजार पुरुष कचाट्यात, सरकार पैसे वसूल करणार?

    Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून ८० लाख लाभार्थ्यांना वगळण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले.

    लाडकी बहीण योजना(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : ‘लाडकी बहीण’ योजनेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी राज्य सरकारने राबवलेल्या छाननी प्रक्रियेत १ कोटी ७० लाख पात्र महिलांची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या सर्व पात्र भगिनींना योजनेचे पैसे नियमितपणे मिळत राहतील. मात्र, वारंवार मुदत देऊनही अद्याप ‘ई-केवायसी’ न केलेल्या आणि निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र लोकांचा लाभ तत्काळ बंद करण्यात आला आहे’, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले.

    योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या १४ हजार पुरुषांना अजिबात सोडले जाणार नाही, त्यांच्याकडून विनाविलंब पैशांची पूर्ण वसुली केली जाईल’, असा इशारा त्यांनी दिला.

    Maharashtra TimesBMC Mayor Ritu Tawade : महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, मुंबईच्या महापौरांना उत्तराखंडमध्ये बहुमान
    ‘लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा महिलांची गैरसोय टाळण्यासाठी आणि कागदपत्रे गोळा करण्यास वेळ मिळावा म्हणून सरकारने ‘सेल्फ सर्टिफिकेशन’च्या (स्वयंघोषणा पत्र) आधारावर अर्ज करण्याची मुभा दिली होती.

    पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकारने आयकर विभाग, रेशन कार्ड, परिवहन विभाग आणि सरकारी कर्मचारी वेतन पोर्टलचा डेटा एकत्र करून त्याची सखोल तपासणी केली. यात, तब्बल ५ लाख महिला या सरकारी नोकरीत कार्यरत असतानाही या योजनेचा लाभ घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय महिलांसाठी असलेल्या या योजनेत तब्बल १४ हजार पुरुषांनी डमी स्वरूपात घुसखोरी करून लाभ लाटल्याचे समोर आले आहे,’ असे ते म्हणाले.

    Maharashtra TimesMaharashtra Cabinet Decisions : फडणवीस सरकारचा बळीराजाला दिलासा, मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी
    ‘पुन्हा खिडकी उघडण्याची तयारी’
    गेल्या ९ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा आणि आवाहन करूनही लाभार्थ्यांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. हे निकष पूर्ण करत नसल्यामुळेच त्यांनी जाणीवपूर्वक केवायसी टाळली असण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अशा अपात्र ठरलेल्या आणि केवायसी न केलेल्या लोकांचे पैसे आता कायमचे रोखले जातील. मात्र, ज्या पात्र महिला तांत्रिक अडचणींमुळे राहून गेल्या आहेत, त्यांच्यासाठी सरकार केवायसीची खिडकी अजूनही उघडी ठेवण्यास तयार आहे, असे सांगत पात्र महिलांनी काळजी करू नये’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. ‘तांत्रिक कारणांमुळे किंवा निकषांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांकडून आतापर्यंत बँकेत जमा झालेल्या पैशांची कोणतीही वसुली सरकार करणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा