Vidhan Parishad Election 2026: महायुतीचे अधिकृत उमेदवार विक्रम काकडे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी होणार असल्याचे जाहीर करून त्यांनी बंडखोरीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि काही लोकप्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर पक्षाने ऐन वेळी सुनील टिंगरे यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज दाखल करून घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
पुढचे CM अजितदादा असते, शिवसेना-राष्ट्रवादी दात नसलेले वाघ; रोहित पवारांची टीका
‘जिजाई’वर समेट
पार्थ पवार आणि सुनील टिंगरे यांच्यात जिजाऊ बंगल्यावर झालेल्या सविस्तर चर्चेत पक्षातील नाराजी, कार्यकर्त्यांच्या भावना आणि भविष्यातील राजकीय संधी यांवर चर्चा झाल्याचे समजते.
डमी अर्जावरून संभ्रम
काकडे यांच्यासह टिंगरे यांनीही अर्ज दाखल केल्यानंतर त्यांचा अर्ज केवळ पर्यायी किंवा डमी असल्याचे पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केले होते. मात्र, टिंगरे यांनी त्या वेळी, ‘मला डमी अर्ज भरण्यास सांगण्यात आलेले नाही,’ अशी भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण तापले होते. या पार्श्वभूमीवर टिंगरे अर्ज कायम ठेवणार का? वेगळी भूमिका घेणार का, याबाबत विविध तर्क-वितर्क लावले जात होते. मात्र, मंगळवारी सकाळी त्यांनी थेट पार्थ पवार यांच्या ‘जिजाई’ निवासस्थानी जाऊन चर्चा केल्यानंतर परिस्थिती पूर्णपणे बदलली.
Pune ST Bus: स्पीड ब्रेकरवर बस आदळल्याने 23 वर्षीय तरुणीचा मणका फ्रॅक्चर; संवेदनाही हरपली, बसचालकावर गुन्हा
मी अजितदादा पवार यांचा कार्यकर्ता आहे. पक्षाचा आदेश माझ्यासाठी अंतिम आहे. पक्षात कोणतीही नाराजी नाही. विक्रम काकडे यांच्या विजयासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे. – सुनील टिंगरे, माजी आमदार
पक्षात कोणतीही नाराजी नाही. विक्रम काकडे हेच महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. सुनील टिंगरे हे पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत. पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि पदाधिकाऱ्याला योग्य वेळी संधी देण्याचा अजितदादांचा शब्द आहे. – पार्थ पवार, खासदार
