राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धंनजय मुंडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि धनंजय मुंडेंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धनंजय देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार देताना धनंजय मुंडेंवर खोटे आरोप केले असल्याचं बोललं जातंय. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. तसेच चौकशीत आरोप खोटे अथवा बिनबुडाचे असल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांवर कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात येतेय.