Pune ST Bus News: स्पीड ब्रेकरवर एसटी बस आदळल्याने मागच्या सीटवर बसलेल्या तरुणीचा मणक्याला फ्रॅक्चर झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी हडपसर येथे राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानुसार, रोशन तानाजी खैरनार (वय ३६, रा. वाखारी, नाशिक) याच्यावर भारतीय न्याय संहितेसह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मे रोजी रात्री जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खडकी रेल्वेस्थानक परिसरात घडली.
Deccan Queen: ‘दख्खनची राणी’ झाली 96 वर्षांची! पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून जल्लोषात साजरा केला वाढदिवस
तक्रारदार तरुणी भावासमवेत वाकडेवाडी एसटी स्थानकातून पुणे-सटाणा बसने पिंपळगाव येथे मामाच्या घरी निघाली होती. भरधाव बस खडकी रेल्वे स्थानकासमोरील गतिरोधकावर आदळली. त्यामुळे तरुणी व तिचा भाऊ आसनावरून उडून खाली पडले. यात तरुणीच्या डोक्याला व कमरेला मार लागला. तरुणीच्या भावाने चालकाला बस बोपोडी चौकातील खासगी रुग्णालयापाशी नेण्यास सांगितले.
तेथे उपचाराची सुविधा नसल्याने तरुणीला रुग्णवाहिकेतून शिवाजीनगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारानंतर तिला डिस्चार्ज दिला. मात्र, त्रास होत असल्याने तिला पुन्हा खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळी तिचा मणका फ्रॅक्चर झाला असून, मल-मूत्र विसर्जनाची संवेदना हरपली असून, तिला हालचाल करता येत नसल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिने रुग्णालयातूनच तक्रार दिली.
Pune MLC Election: राष्ट्रवादीत हाय-व्होल्टेज ड्रामा! विक्रम काकडेंना उमेदवारी, सुनील टिंगरेंना ‘कात्रजचा घाट’; अनेक नेते नाराज
तर दुसऱ्या एका घटनेत, उरण शहरात रविवारी मध्यरात्री झालेल्या दुचाकीअपघातात दोघा मित्रांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी मध्यरात्री दोन वाजता मोरा मार्गावर मोटरसायकलचा भीषण अपघात झाला. यात महेश चांदेकर (३५) आणि निखिल कुकडे (३८) या दोन घनिष्ठ मित्रांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात या दुचाकीचा चक्काचूर झाला आहे. स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांना उरणच्या सरकारी रुग्णालयात नेले. परंतु, दोघांचाही दरम्यान, दोन दिवसांपासून उरण शहरालगत सुरू असलेल्या क्रिकेट मॅच खेळून घरी आलेल्या महेश भोईर या तरुणाचा मृत्यू झाला. क्रिकेट खेळताना प्रकृती बिघडल्याने महेश घरी परतला होता. त्यातच, त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची प्राथमिक माहिती नातेवाईकांनी दिली.
