Nashik Trimbakeshwar News : नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे थेट दर्शनासाठी व्हीव्हीआयपी भाविकांची एकाचवेळी गर्दी होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे व्हीव्हीआयपी ‘विराम दर्शना’साठी ट्रस्टकडून मंडपाची सुविधा केली आहे. अडीच हजार रुपये दर्शनातून एकाच दिवसात १४ लाख तिजोरीत जमा झाले आहेत.
त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी किती पैसे लागतात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात विश्वस्त मंडळाने २५०० रुपयांची व्हीव्हीआयपी तातडीची दर्शनव्यवस्था सुरू केली. मात्र, पूर्वनियोजनाअभावी शनिवारी आणि रविवारी येथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर दरवाजाच्या समोर थेट दर्शनाचा हट्ट धरलेले भाविक आणि त्यात २५०० रुपयांचे तिकीट काढण्याची तयारी असलेले व्हीव्हीआयपी असा एकच गोंधळ सकाळपासून सुरू होता. दुपारच्या सुमारास २५०० रुपयांची देखील रांग लागली. त्यानंतर उत्तर दरवाजाने २०० रुपये दर्शनबारी थांबवून २५०० रुपये देणाऱ्या भाविकांना टप्प्याटप्प्याने सोडण्यात येत होते.
दिवसात जवळपास १४ लाख रुपये
व्हीव्हीआयपी दर्शनातून देवस्थान ट्रस्टला शनिवारी एकाच दिवसात जवळपास १४ लाख रुपये मिळाले असल्याची चर्चा होती. दिवसभरात ५०० भाविकांना २५०० रुपये घेऊन दर्शन देण्याचे नियोजन आहे. तथापि, याचा लाभ घेण्यासाठी किमान हजार भाविक इच्छुक असल्याचे शनिवारी व रविवारी आढळून आले. देवस्थान ट्रस्टला एका दिवसात १४ लाख रुपये मिळत असतील, तर आतापर्यंत हे पैसे कोणाकडे जात होते, असा सवाल उपस्थित होत आहे. यामुळे दर्शनबारीच्या काळ्या बाजाराला चाप बसण्याची शक्यता आहे. Pune News : विषारी दारुकांड प्रकरण; अनेकांच्या संसाराची राखरांगोळी, कुणाच्या भावाचा तर कुणाच्या लेकाचा अंत, पोलिसांच्या धडक कारवाया
सामान्य भाविकांवर अन्याय
दरम्यान, २५०० रुपये दर्शनबारीने पूर्व दरवाजा दर्शनबारीतील भाविकांवर अन्याय होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. २५०० रुपये खर्च करून दर्शनाासठी आलेल्या भाविकाला थेट गर्भगृहापर्यंत नेले जाते. त्यांना समाधानकारक दर्शन घडवले जाते. यासाठी लागणारा वेळ पाहता तेवढ्या वेळात पूर्व दरवाजा अथवा २०० रुपये दर्शनबारीतील किमान १० ते २० भाविक धक्का देऊन बाहेर काढले जातात. एक २५०० रुपये दर्शनाचा भाविक किमान १० भाविकांचा वेळ घेत असेल, तर पाचशे व्हीव्हीआयपी नेहमीच्या दर्शनबारीतील पाच हजार भाविकांना रोखतात. Pune Crime: पुण्यात विषारी दारूने लोकांचा जीव घेतला, आता पोलिसांकडून आकडा लपवण्याचा प्रयत्न? धक्कादायक माहिती उघड सकाळपासून रात्रीपर्यंत पूर्व दरवाजा दर्शनबारी सुरू असते. रात्री ९ पूर्वी दर्शनबारीतील प्रवेश बंद करतात. त्यानंतर दर्शनमंडपात असलेल्या शेवटच्या भाविकाचे दर्शन होते. तोपर्यंत गर्भगृह दरवाजा खुला असतो. शनिवार आणि रविवारी मध्यरात्री १२ वाजेनंतर शेवटच्या भाविकाचे दर्शन झाले. रात्री १० वाजेनंतर मंदिराच्या बाहेर पडलेल्या भाविकाला जेवणाची सुविधा मिळत नाही. सर्वत्र खोदकाम झालेले, त्यात अंधार त्यामुळे त्याला रस्ता सापडत नाही.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा