सुनील जाधव, बीड: मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि समाधान खिंडकर यांच्यात हॉटेलमध्ये झालेल्या वादावादीनंतर एकमेकांवर दाखल झालेले गुन्हे अखेर तपासाअंती खोटे निघाले आहेत. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि जबाबाच्या आधारे दोन्ही बाजूंचे दावे फेटाळून लावत या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय देशमुख हे आपल्या सहकाऱ्यांसह एका हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबले होते. याच हॉटेलमध्ये समाधान खिंडकर हा देखील त्याच्या मित्रांसोबत हजर होता. समाधान आपल्या मित्राला मोबाईलवर एक व्हिडिओ दाखवत असताना, देशमुखांच्या अंगरक्षकाने त्याचा मोबाईल हिसकावल्याचा आरोप झाला. यावरून झालेल्या वादात धनंजय देशमुख यांनी थेट अंगरक्षकाची बंदूक काढून समाधान खिंडकरच्या डोक्याला लावली आणि जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार समाधानने बीड ग्रामीण पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी तात्काळ देशमुखांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. याला प्रत्युत्तर म्हणून धनंजय देशमुख यांनीही समाधान खिंडकर आणि त्याच्या साथीदारांविरोधात आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला होता.
पोलीस तपासात वेगळे वळण परस्परांविरोधी गंभीर गुन्हे दाखल झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलीस उपअधीक्षक व्यंकटराम यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास हाती घेतला. पोलिसांनी हॉटेल परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज अत्यंत बारकाईने तपासले, तसेच धनंजय देशमुख, त्यांचा अंगरक्षक आणि तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले. तपासाअंती दोन्ही बाजूंनी केलेले दावे पूर्णपणे खोटे असल्याचे समोर आले.
जुन्या वादातून दोघांचाही खोटा बनाव जुन्या आणि वैयक्तिक वादातून एकमेकांना अडकवण्यासाठीच दोन्ही तक्रारदारांनी जाणीवपूर्वक हा खोटा बनाव रचल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी अधिकृत प्रेस नोट काढून दोन्ही बाजूंचे गुन्हे खोटे असल्याचे जाहीर केले. दरम्यान, समाधान खिंडकर हा दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार दादासाहेब खिंडकर यांचा भाऊ आहे. यापूर्वी समाधानवर आपल्याच भावाला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या वादाला जुनी पार्श्वभूमी आहे. आता पोलिसांच्या या यूटर्न भूमिकेनंतर धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पोलिसांच्या या कारवाईवर आक्षेप घेतला असून, या संपूर्ण प्रकरणाची हकीकत मांडण्यासाठी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या दोघांनीही खोट्या तक्रारी दिल्यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास करून गुन्ह्यास पात्र ठरले तर तपासाअंती त्यांच्यावर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले असून याबाबतचा पुढील तपास बीड ग्रामीण पोलीस करत आहेत.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा