Beed Talathi Ganesh Koli End his Life : पती-पत्नीत वाद झाला काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असं सांगण्यात आलं आहे.
तलाठी दत्तू कोळी बायको डायरी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सुकेशनी नाईकवाडे, बीड : बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई येथे 25 मे सोमवारी रोजी एका नवविवाहीत तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं. त्याचं लग्न होऊन अवघे 12 दिवस झाले असतानाच, पत्नीच्या असलेल्या प्रेमसंबंधांमुळे आणि जाचाला कंटाळून गणेश दत्तू कोळी (वय 26) या तलाठी तरुणाने राहत्या घरात आपलं आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडल्याचं समोर आलं होतं. अखेर याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात मयत तरुणाची पत्नी दिपाली हिच्याविरुद्ध मयत गणेशच्या आईच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणाबाबत मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार मयत गणेशची आई सुनंदा दत्तू कोळी (रा. नांदूर्गा, ता. औसा, जि. लातूर) यांनी बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा मुलगा मयत गणेश हा 2021 मध्ये राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाला होता. त्यानंतर त्याने तलाठी परीक्षेचा अभ्यास करून 2024 मध्ये चंद्रपूर येथे तलाठी म्हणून नियुक्ती मिळवली होती. मार्च 2026 मध्ये त्याचा विवाह बीड येथील दीपाली धनंजय कोळी हिच्याशी निश्चित झाला आणि 13 मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या उत्साहात पार पडला. दीपाली ही अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कार्यरत आहे. पत्नीच्या जॉब ठिकाणी गणेश काही दिवस राहण्यासाठी अंबाजोगाई येथे आला होता. Crime News: नागपुरातील दर्ग्यात महिलेच्या जबरदस्ती धर्मांतराचा प्रयत्न; नकार देताच विचित्र प्रकार, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल
डायरीत बायकोचे कारनामे लिहिलेले…
दरम्यान, ‘लग्नानंतर कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना मयत गणेशला दीपालीचं वागणं जरा संशयास्पद वाटू लागलं. ती कोणाशी तरी लपून फोनवर बोलत असे. त्यानंतर घरात सत्यनारायणाची पूजा झाली, मात्र दिपालीचं वागणं बदललं होतं. तिने हे लग्न आपल्या मर्जीविरुद्ध झाल्याचं सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला निघून गेली’, असं फिर्यादीत सांगण्यात आलं आहे. Raigad Crime : दागिन्यांच्या मोहाने वृद्ध महिला नातेवाईकाला संपवलं, बॉडी घाटात फेकली; थरारक घटनेनं आंबेनळी घाट पुन्हा चर्चेत गणेश 24 मे रोजी दिपालीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. 25 मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितलं की, ‘दिपालीचं दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसं लिहून ठेवलं आहे. ते मी वाचलं आहे’. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने दिपाली राहत असलेल्या खोलीत टोकाचं पाऊल उचललं असल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली होती. दिपालीचे बाहेरील अनैतिक संबंध आणि मानसिक त्रासामुळेच गणेशने आत्महत्येचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या आईने केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अखेर भारतीय न्याय संहितेच्या कलम 108 नुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ कांगणे हे या प्रकरणातील सखोल तपास करत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा