• Sat. Jun 6th, 2026
    MLC Election : ‘हळूहळू शिवसेनेला मारायचंय, एक-एक गड संपू लागले’, अब्दुल सत्तार यांचा भाजपवर घणाघात

    विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुतीत ही जागा भाजपला सुटलेली असताना समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    छत्रपती संभाजीनगर : विधान परिषदेच्या 16 जागांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या तीनही घटकपक्षांकडून उमेदवारांची घोषणा झाली आहे. असं असलं तरी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत बंडखोरी झालेली बघायला मिळत आहे. आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी छत्रपती संभाजीनगर-जालना विधान परिषदेच्या जागेसाठी अर्ज दाखल केला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला होता. पण महायुतीत ही जागा भाजपला सुटली आहे. यानंतर अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या समीर सत्तार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

    सत्तेत राहून आम्हाला बाहेरचा मार्ग दाखवला जातोय, असं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे व्यथा मांडणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. पालकमंत्री असतानाही शिवसेना संपवण्याचं काम केलं जात आहे, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

    अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?

    “भारतीय जनता पक्षासाठी आम्ही आमच्या जुन्या पक्षनेत्याला सोडून इकडे आलो, आणि परत अशी परिस्थिती निर्माण होईल? आज जी परिस्थिती निर्माण होईल ते स्लो पॉईजन आहे. हळूहळू शिवसेनेला मारायचं. स्लो पॉयजनची जी परिस्थिती निर्माण झाली त्यावर भविष्यामध्ये उपचार करणं गरजेचं आहे. या परिस्थितीत आम्हाला जे समोर दिसतंय, त्यामधील एक-एक गड आमचे संपू लागले आहेत”, असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला.

    “शेवटी आमचे जे मतदार आहेत, नगरसेवक, सिल्लोडमध्ये आमचे सर्वाधिक नगरसेवक आहेत. त्यांना ज्या पद्धतीने सत्तेमध्ये असलेल्या दोन्ही मंत्र्यांकडून होणारा अन्याय, याला आमच्या नेत्यांपर्यंत एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत मांडावं हा आमचा अधिकार आहे. आमचे सर्वाधिक नगरसेवक असून आमच्या महापालिकेला निधी मिळत नसेल तर पक्षात राहून आपल्याच पालकमंत्र्यांकडून आपल्यावर अन्याय होत आहे”, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला.

    “आपल्याच जिल्ह्याचे जे भाजपचे मंत्री आहेत तेच आमच्यावर अन्याय करतात. मग आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत तेच समजत नाही. म्हणून तर आमच्या नेत्यांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आम्ही आमची सर्व भावना मांडू. त्यातून ते काय मार्ग काढतात, यानंतर पुढची राजकारणाचे तीन दिवस आहेत यावरुन निर्णय होईल”, असं अब्दुल सत्तार म्हणाले.

    अतुल सावे काय म्हणाले?

    भाजपचे मंत्री अतुल सावे यांनी अब्दुल सत्तार यांच्या आरोपांना एका वृत्तवाहिनीवर उत्तर दिलं. “माझी अब्दुल सत्तार यांना विनंती आहे की, हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी एकत्रितपणे घेतला आहे. अब्दुल सत्तार यांनी आमच्यावर आरोप करणे चुकीचे आहे. त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी आपल्या नेत्यांसमोर मांडावं. त्यांच्या मुलाने जी काही बंडखोरी केली आहे त्याचा अर्थ असा होतो की, एकनाथ शिंदे यांनी दिलेला आदेश ते ऐकत नाहीत. ते एकनाथ शिंदे यांचा अपमान करत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगावं, माझ्यावर आरोप करुन काय होणार?”, असा सवाल अतुल सावे यांनी केला.

    अब्दुल सत्तार काय म्हणाले?

    अतुल सावे यांच्या प्रत्युत्तरावर अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली. “मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही आरोप केला नाही. माझा आरोप अतुल सावे यांच्यावर आहे. मी मुख्यमंत्र्यांबाबत एकही शब्द बोललो असेल तर तपासून पाहा. अतुल सावे यांनी मंत्री झाल्यापासून एक रुपया देखील निधी दिला नाही. आमच्या नगरपालिकेला निधी देत नाहीत. नगरपालिकेत आमचे 51 सदस्य आहेत. या 51 लोकांना न्याय मिळत नसेल तर त्यांनी त्यांना मतदान का करावं? मी अतुल सावे यांना एकट्यांना बोललो नाही तर आमच्या पक्षाचे जे पालकमंत्री आहेत त्यांनाही बोललो आहे. मी निधीचा आरोप केला. तुम्ही ज्या पद्धतीने आमच्या विरुद्ध राजकारणाचे षडयंत्र करतात, त्याबद्दल मी बोललो”, अला घणाघात अब्दुल सत्तार यांनी केला.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

    डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

    चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

    चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

    चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

    महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

    चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा