• Sat. Jun 6th, 2026

    MLC Election: विधानपरिषदेच्या अर्ज माघारीसाठी १५० कोटींचा व्यवहार; राऊतांचा आरोप, आता भाजपकडून बोचरा पलटवार, बावनकुळे काय म्हणाले?

    MLC Election: विधानपरिषदेच्या अर्ज माघारीसाठी १५० कोटींचा व्यवहार; राऊतांचा आरोप, आता भाजपकडून बोचरा पलटवार, बावनकुळे काय म्हणाले?

    नागपूर : विधान परिषद निवडणुकीत विरोधी पक्षांच्या उमेदवारांना कोट्यवधी रुपयांच्या ऑफर्स देऊन आणि दबावतंत्राचा वापर करून उमेदवारी अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत असताना भाजप नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच भाजपने कधीही दबावाचे किंवा गुंडागर्दीचे राजकारण केलं नसल्याचं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे.

    बावनकुळे म्हणाले की, भाजपने कधीही दबावाचं राजकारण केलं नाही. गुंडागर्दी आणि दबावाचे राजकारण काँग्रेसने ६५ वर्षे केले. मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि इतरांनी सरकारचा प्रचंड वापर करून गुंडशाहीचा माध्यमातून निवडणुका लढल्या. मात्र आता राज्यात एकही उमेदवार दाखवा ज्याच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली आहे. काँग्रेसला स्वतःचे लोक सांभाळता येत नसल्यामुळे ते आरोप करत आहेत, असा टोला देखील त्यांनी लगावला.

    “खरंतर ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणुका पार पडल्या, त्या सर्वांचे मी आभार मानतो. आज ज्याप्रकारे पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा आहे, अशावेळी त्यांनी समजूतदारपणा दाखवला आहे. अनावश्यक निवडणूक खर्च टाळणे गरजेचे आहे. कारण या निवडणुका संख्याबळावर आहे. नागपूरमध्येही भाजप आणि महायुतीकडे सुमारे ५८० मते असून महाविकास आघाडीकडे सुमारे २६० मते आहेत. त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी आहेत. अशा परिस्थितीत निवडणूक घेऊन खर्च करण्यापेक्षा बिनविरोध निवडणूक अधिक योग्य ठरली असती, मी सर्वांना आवाहन केलं होतं की, ही निवडणूक बिनविरोध करून घ्या. कारण त्यासाठी मतदान असले पाहिजे. युद्धजन्य परिस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला. एकतर्फी निवडणूक असताना अनावश्यक खर्च टाळला जातो. ज्या ठिकाणी स्पष्ट बहुमत आहे, तिथे निवडणूक बिनविरोध व्हावी. मात्र जिथे अटीतटीची लढत आहे, तिथे आमचे काही म्हणणे नाही. चंद्रपूर, यवतमाळ आणि रायगड येथे सुमारे ९० टक्के मतदान महायुतीकडे आहे. त्यामुळे तेथे निवडणूक लढवून काही फायदा नाही. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक झाली आहे. या निवडणुकीमध्ये जे आमदार निवडून येतील त्यांना मी शुभेच्छा देतो आणि अशीच परंपरा महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजे,” असेही बावनकुळे नागपूर इथं बोलताना म्हणाले.

    दरम्यान, दोन मतदारसंघांत काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याच्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, ज्यांनी उमेदवारी मागे घेतली त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी कोणत्या कारणामुळे माघार घेतली हे मला माहीत नाही. विदर्भातील निवडणुकांची जबाबदारी माझ्याकडे असली तरी त्यांच्याशी भाजपने कोणताही संपर्क साधलेला नाही. जिथे ७० टक्क्यांहून अधिक मतदान एकतर्फी आहे, तिथे समोरच्या उमेदवाराचा पराभव निश्चित असतो. त्यामुळे काही उमेदवारांनी वास्तववादी भूमिका घेतली असावी. ज्यांना भाजपची विचारधारा पटते, त्यांनी आमच्यासोबत यावे,” असं आवाहनही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

    पत्रकारितेतील अनुभव
    अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

    मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

    शैक्षणिक पात्रता
    अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed