Tukaram mundhe fda action: गेल्या काही दिवसांपासून आयपीएस अधिकारी तुकाराम मुंढे हे खूप चर्चेत आले आहेत. त्यांनी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारताच राज्यभर कारवाईला सुरुवात केली आहे. नियमभंग करणाऱ्या भ्रामक औषध जाहिराती आणि औषधविक्रेत्यांवर त्यांनी थेट कारवाई केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारताच राज्यभरात भ्रामक औषध जाहिराती आणि नियमभंग करणाऱ्या औषध विक्रेत्यांविरोधात मोठी धडक मोहीम सुरू केली आहे. ‘औषधे व जादूटोणादी (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा १९५४’ अंतर्गत राज्यातील विविध विभागांमध्ये एकाचवेळी छापेमारी करत तब्बल ७३ लाख २४ हजार ६५६ रुपयांचा औषधसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्यातील बृहन्मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागांमध्ये ही विशेष मोहीम राबवण्यात आली. गंभीर आजारांवर हमखास उपचार, चमत्कारिक परिणाम आणि दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या आयुर्वेदिक औषधांच्या जाहिराती प्रशासनाच्या रडारवर होत्या. त्यानंतर औषध निरीक्षकांनी विविध आस्थापनांवर कारवाई करत मोठा साठा जप्त केला.
‘दिव्या फार्मसी’च्या उत्पादनांवर मोठी कारवाई
या मोहिमेत दिव्या फार्मसी या उत्पादक कंपनीच्या विविध औषधसाठ्यावर कारवाई करण्यात आली. नागपूर विभागात ७.२६ लाख, नाशिक विभागात ७.१० लाख, बृहन्मुंबई विभागात १४.६८ लाख, कोकण विभागात १८.५८ लाख तर अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागातही मोठ्या प्रमाणावर साठा जप्त करण्यात आला.
पुणे विभागात तपासणीदरम्यान दोन मिथ्याछाप (मिसब्रँडेड) अॅलोपॅथी औषधांचा तब्बल २१.८३ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. राज्यभरातील १२ आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर ही कारवाई करण्यात आली.
Mumbai Local: कसारा लोकल ‘हे’ 4 दिवस अंशतः बंद! मध्य रेल्वेचा मेगा ब्लॉक; आसनगावपुढे सेवा ठप्प
‘आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना सवलत नाही’
“जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला किंवा आस्थापनेला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. भ्रामक जाहिराती, अवैध औषध उत्पादन आणि विक्रीविरोधातील कारवाई अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल,” असा स्पष्ट इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. तसेच औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० आणि संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात थेट न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांसाठी तक्रार यंत्रणा
एफडीएकडून नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही भ्रामक जाहिरातींवर विश्वास ठेवून स्वतःहून औषधांचे सेवन करू नये, असे प्रशासनाने म्हटले आहे. सेल्फ-मेडिकेशनमुळे गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनी संशयास्पद औषध विक्री, अवैध साठा किंवा दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबत त्वरित तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा