• Fri. Jun 5th, 2026
    लास्ट सीन टुगेदर पुरावा योग्य नाही, नसरापूर प्रकरणी आरोपीच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद, कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

    Pune Crime : आरोपी मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा वैद्यकीय अहवाल आणि या खटल्यातील एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आली.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म. टा. प्रतिनिधी, पुणे : नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिचा खून केल्याप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे याच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात गुरुवारी आरोप निश्चित करण्यात आले. या प्रकरणात दाखल आरोपपत्र आणि आरोपीविरोधातील पुरावे आरोप निश्चित करण्यासाठी भक्कम असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले असून, या खटल्याची आजपासून (शुक्रवार) दररोज ‘इन-कॅमेरा’ सुनावणी घेण्याचे आदेश दिले.

    दरम्यान, आरोपी मानसिकदृष्ट्या सुदृढ असल्याचा वैद्यकीय अहवाल आणि या खटल्यातील एकूण ८२ साक्षीदारांची यादी सरकार पक्षातर्फे न्यायालयात सादर करण्यात आली.

    वासरु दाखवण्याच्या बहाण्याने नेलं

    विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयात आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) याला गुरुवारी सकाळी अकराच्या सुमारास कडेकोट बंदोबस्तात हजर करण्यात आले. आरोपीने एक मे रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास चिमुकलीला गाठीशेव देतो आणि गाईचे वासरू दाखवतो, असे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिला गोठ्याशेजारच्या शेडमध्ये नेऊन अत्याचार केला. तिच्या तोंडात बोळा कोंबून छातीवर मारहाण करून तिचा खून केला. त्यानंतर तिचं शव लपवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा घटनाक्रम विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात सांगितला.
    Maharashtra TimesPune News : एकाच दिवशी एकाच परिसरात सात जणांचा अकस्मात मृत्यू, पुण्याच्या दापोडीत खळबळ, गावठी दारुची अफवा पोकळ, कारण काय?

    आरोपी लैंगिक व मानसिकदृष्ट्या सक्षम

    आरोपी पीडित मुलीला घेऊन जात असल्याचे ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणात दिसत आहे. आरोपी आणि पीडितेला एकत्र पाहणाऱ्या लहान मुले आणि ग्रामस्थांनी पोलिस व न्यायालयासमोर जबाब नोंदविले आहेत. ओळख परेडमध्ये साक्षीदारांनी आरोपीला ओळखले आहे. आरोपी लैंगिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचा वैद्यकीय अहवाल, ‘डीएनए’ चाचणी व न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल, शवविच्छेदन अहवाल, घटनास्थळाचा पंचनामा, आरोपीच्या कबुलीजबाबावरून हस्तगत मुद्देमाल आदी पुरावे आणि एकूण ८२ साक्षीदारांची यादी त्यांनी न्यायालयात सादर केली.

    एकनाथ शिंदे पॉवरफुल! शरद पवारांसह मविआला मोठा झटका; २५००० कार्यकर्ते शिवसेनेत

    आरोपीविरोधात दाखल गुन्ह्याची कलमे सिद्ध करणारे भक्कम साक्षीदार, कागदोपत्री आणि परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी उपलब्ध असून, आरोपीविरोधात आरोप निश्चित करण्याची विनंती ॲड. मिसर यांनी केली. त्यांना ॲड. सुरेश गायकवाड आणि ॲड. प्रथमेश शिंगणे यांनी सहकार्य केले.

    लास्ट सीन टुगेदर पुरावा

    विधी साह्य संरक्षण वकील हिंमतराव सूर्यवंशी यांनी आरोपीची बाजू मांडली. अपहरण, विनयभंग आणि खून सिद्ध करण्याइतका ठोस पुरावा आरोपपत्रात नाही; तसेच ‘लास्ट सीन टुगेदर’ व न्यायवैद्यक पुरावेही योग्य नाहीत, असा युक्तिवाद त्यांनी केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित करण्याइतका प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे नमूद केले. आरोपीला आरोप वाचून दाखवण्यात आले असता त्याने ते नाकारले. त्यामुळे न्यायालयाने या खटल्याची दररोज सुनावणी घेण्याचे आदेश दिले.
    Maharashtra TimesCrime News : बेपत्ता मुलीला पोलिसांनी ‘मृत’ ठरवलं, बाप-भावाला तुरुंगात डांबलं, शिवानी अचानक ‘जिवंत’ परतली, म्हणाली…
    आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार कलम १३७ (२) (अपहरण), १४० (१) (अपहरण करून खून), कलम ६४ (अत्याचारासाठी शिक्षा), ६५ (२) (बारा वर्षांखालील मुलीवर अत्याचार), कलम १०३ (१) (खून), कलम ७४ (विनयभंग) आणि अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या (पोक्सो) चार, पाच, सात, अकरा आणि बारा या कलमांनुसार आरोप निश्चित करण्यात आले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा