• Fri. Jun 5th, 2026
    Pune News : आधी सहा आता पुन्हा पाच जणांचा संशयास्पद मृत्यू, पुण्यातील ‘त्या’ मृत्यूचं गूढ काय? नागरिकांचा पोलिसांवर गंभीर आरोप

    Pimpri Chinchwad Crime News : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. अशातच पिंपरी-चिंचवडमध्ये एक मोठी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

    पिंपरी चिंचवड गावठी दारु १२ जणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये गावठी दारूमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर परिसरातील काळेपडळ येथे पाच जणांचा तर पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी येथे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    आधी फुगेवाडी येथील सहा मृतांपैकी चार जणांचा मृत्यू हा हृदयविकारासह इतर कारणांमुळे झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत होतं. मात्र, या सर्वांचा मृत्यू केमिकलयुक्त दारु प्यायल्याने झाला असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, फुगेवाडी आणि हडपसरमधील काळेपडळ परिसरात स्पिरिट म्हणजेच केमिकलयुक्त दारू पुरवणाऱ्या योगेश वानखेडे याला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, योगेश वानखेडे हा केमिकलयुक्त गावठी दारू तयार करण्याचा व्यवसाय करत होता. दोन दिवसांपूर्वी त्याने फुगेवाडी आणि काळेपडळ परिसरात ही दारू पुरवल्याचं समोर आलं आहे.

    Maharashtra TimesCrime News : बेपत्ता मुलीला पोलिसांनी ‘मृत’ ठरवलं, बाप-भावाला तुरुंगात डांबलं, शिवानी अचानक ‘जिवंत’ परतली, म्हणाली…

    एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी

    या दारूमुळे फुगेवाडी येथे सहा जणांचा आणि काळेपडळ येथे पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणामुळे एक्साईज विभागाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. योगेश वानखेडे हा एक्साईज विभागाच्या रेकॉर्डवरील सराईत आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील त्याच्यावर 2023, 2024 आणि 2025 या वर्षांमध्ये केमिकलयुक्त दारू प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. तरीदेखील त्याच्यावर कठोर कारवाई झाली नसल्यानेच आजही परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे.

    Maharashtra TimesTuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च
    एक्साईज विभागाला याबाबत आधी माहिती नव्हती का? दापोडी पोलिसांना या प्रकाराची कल्पना नव्हती का? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. संबंधित यंत्रणांनी वेळेत कारवाई केली असती तर निष्पाप नागरिकांचे जीव वाचले असते, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी एक्साईज विभागाचे एसपी अतुल कानडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, रात्री उशिरा योगेश वानखेडे हा एक्साईज विभागासमोर शरण आला. त्यानंतर त्याला पिंपरी- चिंचवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

    प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

    ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा