Amaravati Farmer News: नव्या योजनेतील जाचक तांत्रिक निकषांमुळे नुकसान होऊनही हजारो शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावे लागले आहे, तर कंपन्यांनी मात्र कोट्यवधींचा नफा कमावला आहे.
गतवर्षी लागू झालेल्या नव्या पीक विमा योजनेत पूर्वीचे महत्त्वाचे चार निकष हटवण्यात आले आहेत. आता केवळ पीक कापणी प्रयोग आणि सॅटेलाइट तंत्रज्ञानावर आधारित ५० टक्के उत्पादकतेचा सरासरी निकष लावण्यात आला आहे. याच चुकीच्या निकषांमुळे प्रत्यक्ष शेतात पिकांचे अतोनात नुकसान होऊनही हजारो शेतकरी पीक विम्याचा दावा मिळवण्यास अपात्र ठरले आहेत.
Vidhan Parishad : पार्थ पवार दिल्लीत तळ ठोकून, पुणे विधानपरिषदेची जागा NCP ला फिक्स? ‘तहा’त मोठं पद गमवावं लागण्याची चर्चा
गेल्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १० तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला; तर, ४२ मंडळांमध्ये अतिवृष्टीमुळे पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली होती. उत्पादनात प्रचंड घट होऊनही विमा कंपन्यांनी तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत तांत्रिक कारणांखाली या सर्व १० तालुक्यांमधील शेतकऱ्यांचे दावे फेटाळून लावलयाचा आरोप होत आहे.
योजनेवरील विश्वास उडाला !
पीक विमा योजनेंतर्गत हक्काचा मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, बळीराजा दुहेरी संकटात सापडला आहे. ही योजना नेमकी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आहे की विमा कंपन्यांचे भले करण्यासाठी, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. या फसव्या कारभारामुळे आगामी हंगामात पीक विमा भरण्याकडे शेतकरी पाठ फिरवण्याची दाट शक्यता आहे.
Tuljabhawani Temple Sanstha : तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या तिजोरीत तब्बल 48 कोटी रोकड, गेल्यावर्षी 10 किलो सोनं दान; भाविकांच्या सोयीसाठी खर्च
असे आहे आकड्यांचे गणित
जिल्ह्यातील सहभागी शेतकरी : १ लाख ८५ हजार ५६०
जमा झालेला एकूण प्रीमियम : ११.२४ कोटी रुपये
(शेतकऱ्यांचे ८.९० कोटी आणि केंद्र व राज्य सरकारचे प्रत्येकी २.१२ कोटी)
मंजूर झालेला क्लेम : २ कोटी ३० लाख रुपये
लाभ मिळालेले शेतकरी : ९ हजार ३४२
वंचित राहिलेले शेतकरी : १ लाख ७६ हजार २१८
