• Sat. Jun 6th, 2026
    राज्यात मोसमी पावसाचे आगमन लांबणीवरच, दोन आठवडे अल्प पावसाचा अंदाज; मुंबईत कधी दाखल होणार मान्सून?

    Weather Forecast: महाराष्ट्रात तापमानाचा पारा चढत असताना नागरिकांना पावसाची आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पुढील दोन आठवडे महाराष्ट्रात फारसा पाऊस नसेल तर कोकणात काही ठिकाणी आज पाऊस होईल.

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    म.टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: केरळमधील मान्सून आगमनाच्या तारखेचा नवा अंदाज अजूनही भारतीय हवामान विभागाकडून देण्यात येत नसल्याने नागरिकांची पावसाची प्रतीक्षा लांबत चालली आहे. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या येत्या दोन आठवड्यांच्या पूर्वानुमानानुसार राज्यात ११ जूनपर्यंत किनारपट्टी भागात आणि राज्याच्या अंतर्भागात अल्प पावसाचा अंदाज आहे. देशातील बहुंताश भागातही या काळात फारसा पाऊस नसेल. मुंबईत मान्सून दाखल होण्याची सरासरी तारीख ११ जून आहे.

    कुठे-कधी पाऊस होणार?

    महाराष्ट्रात किनारपट्टीवर तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ४ जूनपर्यंतच्या कालावधीत प्रतिदिन १० मिलीमीटर पाऊस पडू शकेल असा अंदाज आहे. त्यानंतरच्या आठवड्यात म्हणजे ४ ते ११ जून या कालावधीत किनारपट्टीवर पावसाचा जोर थोडा वाढू शकेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तर विदर्भातही पावसाची व्याप्ती वाढू शकेल.

    Maharashtra TimesWeather Update: पाऊस पडला, उष्मा कायम! नागपूर देशात पाचवे उष्ण शहर; 46.4 अंश सेल्सिअसची नोंद
    हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार, 31 मे ते 3 जूनदरम्यान कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह विजा कडाडणार आहेत. त्यानंतरच्या आठवड्यात मान्सूनचे वारे दक्षिण भारताच्या काही भागात व्यापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, 4 ते 11 जूनपर्यंत कोकण, गोवा येथे तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    15 राज्यांमध्ये आज अलर्ट

    दरम्यान, हवामान विभागाने भारतातील 15 राज्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहारसह अनेक भागांमध्ये शुक्रवारी, 29 मे रोजी, अलर्ट देण्यात आला आहे. ताशी 90 किमी वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांसह या परिसरात पाऊस होईल. यामुळे देशातील काही ठिकाणी पारा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

    वायव्य भारत, राजस्थान, विदर्भ आणि पूर्व मध्य प्रदेशात काही ठिकाणी तापमानात घट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 29 ते 31 मे दरम्यान उत्तर, मध्य आणि पूर्व भारतात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यासह, पुढील 2 ते 3 दिवसांत ईशान्य आणि पूर्व भारतातील काही भागांतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. शिवाय, अलर्ट दिलेल्या 15 भागांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू व काश्मीरचा समावेश आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा