• Wed. Aug 26th, 2026
Maharashtra Live News 29th May 2026 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग बातम्या पाहा एकाच ठिकाणी

Weather Update : पाऊस पडला, उष्मा कायम! नागपूर देशात पाचवे उष्ण शहर; 46.4 अंश सेल्सिअसची नोंद

शहराच्या काही भागांत दुपारी पावसाच्या सरी बरसल्या. आता वातावरणात गारवा येईल, असे वाटत असतानाच पुन्हा कडक ऊन पडले, अन् उष्मा कायम राहिला. नागपूरकरांच्या आशेवर पाणी फेरले गेले. शहरासह विदर्भात गुरुवारीही उष्णतेची तीव्र लाट कायम राहिली. अनेक जिल्ह्यांतील कमाल तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. नागपुरात कमाल तापमान ४६.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले, तर वर्धा येथे ४६.८ अंश सेल्सिअससह सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. दुपारच्या सुमारास शहर अक्षरशः तापले होते. उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र, संध्याकाळी शहरात झालेल्या पावसामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला, तो काही वेळच टिकला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed