• Sat. Jun 6th, 2026
    Vidhan Parishad Election: भाऊ, तुम्ही लढाच; मागे हटू नका! विधान परिषद बिनविरोध टाळण्यासाठी लोकप्रतिनिधींचे देव पाण्यात

    Vidhan Parishad Election: विधान परिषदेला राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह मानले जाते. राज्यात १७ जागांवर ही निवडणूक होत असून, महापालिका नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, नगरपालिका, नगरपरिषदेचे नगरसेवक मतदार आहेत.

    विधान परिषद निवडणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक: विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध होण्याच्या हालचालींमुळे स्थानिक लोकप्रतिनिधी असलेले जिल्ह्यातील ६२३ मतदार अस्वस्थ झाले आहेत. या निवडणुकीत एकेका मताचा भाव १५ लाखांपर्यंत पोहोचण्याचेही आडाखे बांधले जात आहेत. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ‘कमाई’ आटली असताना किमान नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत झालेला खर्च तरी विधान परिषदेच्या माध्यमातून भरून निघावा, अशी अपेक्षा नगरसेवक बोलून दाखवू लागले आहेत. अनेकांनी तर इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन ‘तुम्ही मैदानात राहाच’ असे साकडे घालण्यास सुरुवात केली आहे!

    ओबीसी आरक्षणामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चार वर्षांनंतर नुकत्याच पार पडल्या आहेत. या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदारांना ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याचे सर्वश्रुत आहे.

    Maharashtra TimesMLC Election: विधानपरिषदेच्या तीन जागांवरून महायुतीत संघर्ष, वाद थेट अमित शहांपर्यंत गेला; नाशिकसह आणखी कोणत्या दोन ठिकाणी चढाओढ?
    एकीकडे लाडक्या बहिणींमुळे सरकारचा निधी आटला आहे, तर दुसरीकडे सिंहस्थाच्या कामांची कंत्राटांची प्रक्रिया वरिष्ठ स्तरावरून झाली आहे, तसेच बाहेरील ठेकेदारांना ती कामे देण्यात आल्याने नगरसेवक निधी जवळपास थांबला आहे. त्यामुळे निवडणुकीचा खर्च काढून घेण्याची नामी संधी म्हणून विधान परिषदेकडे पाहिले जात आहे. मात्र, महायुतीकडे ६२३ पैकी ४६९ एवढे पाशवी बहुमत आहे, तर मविआकडे तोकडी सदस्यसंख्या आहे. त्यामुळे महायुतीचा एकच उमेदवार असावा, यासाठी प्रयत्न होत असल्याने मतदारांना धडकी भरली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी मतदारांनीच बाहुबली नगरसेवकांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.

    जिल्ह्यात शंभर कोटींची उलाढाल ?
    जिल्ह्यात या निवडणुकीसाठी ६२३ मतदार आहेत. जिल्हा परिषदेची निवडणूक न झाल्यामुळे ७२ मतदार कमी झाले आहेत. त्यामुळे निवडणूक झाल्यास एका मताचे मोल १० ते १५ लाखांपर्यंत जाणार आहे. त्यामुळे एका उमेदवाराचा कमीत कमी खर्च ५० कोटींपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दोन उमेदवार असल्यास हा खर्च १०० कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत झालेला खर्च काढून घेण्याची आयती संधी मतदारांना चालून आली आहे.

    Maharashtra TimesCrime News: 25 वर्षीय विवाहित सोनालीचं प्रियकरासोबत भयंकर कृत्य; संपवल्यानंतर चक्कर आल्याचा बनाव, पण नंतर भांडाफोड!
    विधान परिषद पक्षीय बलाबल
    भाजप- १९१
    शिवसेना- १७१
    राष्ट्रवादी (अजित पवार गट)- १०७
    शिवसेना (उद्धव ठाकरे गट)- ५२
    इस्लाम पार्टी- ३५
    एमआयएम- २१
    काँग्रेस- १३
    अपक्ष व इतर- ३४

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

    किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

    शैक्षणिक पात्रता
    किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा