• Wed. Jun 17th, 2026
    17 व्या वर्षी घरातून पळाला, रस्त्यावर भीक मागत 10 वर्ष ढकलली, मुंबई पोलिसांमुळे कुटुंबाशी पुनर्मीलन, गळ्यात पडून रडले

    Mumbai Man reunited with Family : पोलीस ठाण्यात आणून काही खाऊ-पिऊ दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांनी तरुणाची पुन्हा चौकशी केली. त्यावेळी तरुणाने आपले नाव कमरुद्दीन असे सांगितले

    (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    मुंबई : सध्या ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा भागात राहणाऱ्या एका कुटुंबातील किशोरवयीन मुलगा जवळपास गेल्या दहा वर्षांपासून बेपत्ता होता. परंतु मालाड पोलीस ठाण्यात अखेर त्याची परिवाराशी पुनर्भेट झाली. पोलिसांनी तरुणाला रस्त्यावर भीक मागताना पाहिलं. त्याच्या पार्श्वभूमीची सखोल तपासणी करण्याचं ठरवल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

    आधी उडवाउडवीची उत्तरं

    सध्या २७ वर्षांचा असलेला कमरुद्दीन खान आपल्या आई-वडिलांना पाहताच गहिवरुन गेला. २६ मे रोजी मालाड पोलीस पुनर्वसनासाठी रस्त्यांवरील भिकाऱ्यांना ताब्यात घेण्याची एक नियमित मोहीम राबवत होते. या पथकाला एक तरुण आढळला, ज्याने आपण उत्तर प्रदेशातील ‘बस्ती’ गावाचा रहिवासी असल्याचे सांगितले. मात्र त्याच्या कुटुंबाविषयी अधिक विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

    त्याला पोलीस ठाण्यात आणून काही खाऊ-पिऊ दिल्यानंतर, दुसऱ्या दिवशी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची पुन्हा चौकशी केली. त्यावेळी तरुणाने आपले नाव कमरुद्दीन असल्याचे सांगितले. आपण साकीनाका येथील एका उर्दू शाळेजवळ राहत असल्याचे तो म्हणाला.
    Maharashtra TimesPune NEET Paper Leak : मोटेगावकरच्या मुलाला प्रश्न पाठवले, लातूरच्या डॉ शिरुरेच्या चौकशीत मोठी माहिती, GOD तेजस शहाचं पुणे कनेक्शन समोर

    साकीनाक्यात शेजाऱ्यांनी ओळखलं

    कमरुद्दीनने वर्णन केलेल्या ठिकाणी पोलिसांचे एक पथक गेले, परंतु त्यांना त्याचे कुटुंब सापडले नाही. त्यांनी स्थानिक रहिवाशांना त्याचे फोटो दाखवले; त्यापैकी दोघांनी त्याला ओळखले. त्यांनी पोलिसांना सांगितले की, कमरुद्दीन शाळेत जात असताना आपल्या आई-वडिलांसोबत साकीनाका येथे राहत असे. परंतु दहा वर्षांहून अधिक काळापूर्वी तो परीक्षेत नापास झाला आणि घरातून पळून गेला. त्यानंतर त्याचे कुटुंब मुंब्रा येथे स्थलांतरित झाले होते.

    श्रीकांत शिंदेंसोबत बंद दाराआड चर्चा; मध्यरात्रीच्या बैठकीनंतर प्रताप चिखलीकर यांची प्रतिक्रिया

    स्थानिक रहिवाशांनी पोलिसांना कमरुद्दीनच्या मावशीचा फोन नंबर दिला. त्यांच्या माध्यमातून पोलिसांना त्याच्या पालकांशी संवाद साधता आला. बुधवारी मालाड पोलीस ठाण्यात कमरुद्दीन आणि त्याच्या कुटुंबीयांची अत्यंत भावपूर्ण भेट झाली.

    डीसीपी संदीप घुगे, वरिष्ठ निरीक्षक दुष्यंत चव्हाण आणि निरीक्षक संजय बेदल यांच्या मार्गदर्शनाखाली, मालाड पोलिसांनी अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत अशा चार व्यक्तींना त्यांच्या कुटुंबीयांशी पुन्हा एकत्र आणले आहे.
    Maharashtra TimesNashik News : गरोदर आईसह बाबा बुडाले, चिमुकली धरणाकडे बोट दाखवत निघाली; कुस्ती स्पर्धा सोडून पैलवान धावले, पण चौघांनी प्राण गमावलेच

    मुंबईतील भिकारी निघालेला मेडिकल विद्यार्थी

    यापूर्वी, मुंबई पोलिसांचे एक पथक मालाडच्या एसव्ही रोडवरुन भिकाऱ्यांना ताब्यात घेत असताना कॉन्स्टेबल कोमलसिंग जाधव यांना विशीतील एक तरुण आढळला होता, त्याला साध्या प्रश्नांची उत्तरे देता येत नव्हती, सुसंगतपणे बोलताही येत नव्हते. तो संकटात असल्याचे ओळखून जाधव यांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं आणि कोमट पाण्याने आंघोळ घालत, गरम जेवण देऊन शांत केलं. काहीसा सावरल्यानंतर, एका पोलीस उपनिरीक्षकाने त्याच्या भूतकाळाविषयी हळूवारपणे चौकशी करण्यास सुरुवात केली असता तो नांदेड येथील वैद्यकीय विद्यार्थी असल्याचं उघड झालं होतं.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

    पत्रकारितेतील अनुभव
    अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

    पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

    अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

    शैक्षणिक पात्रता
    अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा