• Sun. Jun 14th, 2026

    सिंहगड किल्ल्याजवळ बोगदा, खडकवासलावर पूल, पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना वेग; पश्चिम बायपासमुळे फायदा होणार

    सिंहगड किल्ल्याजवळ बोगदा, खडकवासलावर पूल, पुण्यात बाह्य रिंग रोडच्या कामांना वेग; पश्चिम बायपासमुळे फायदा होणार

    पुणे: पुण्यात बाह्य रिंग रोडचं बांधकाम वेगाने सुरू आहे. रिंग रोडच्या पश्चिमेकडील भागात अनेक भुयारी मार्ग आणि पूल आहेत. या भागावरील काम अधिक कठीण असलं तरी प्रगती दिसून येत आहे. शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक आणि शहराबाहेरील वाहनांची वाहतूक विभागण्यासाठी या सहा पदरी मार्गाची योजना आखली आहे. शहराच्या बाहेरून तयार केलेल्या या वर्तुळाकार मार्गामुळे नागरिकांचा पुण्यातील प्रवास सुखकर होणार आहे.

    कसा होणार फायदा?

    पुणे रिंग रोडचं काम एकूण 12 पॅकेजेसमध्ये विभागलेलं आहे. यापैकी काही पॅकेजेस पश्चिम तर काही भाग पूर्व भागांत आहे. यापैकी पश्चिमेकडील काम लवकर पूर्ण होणार आहे. संपूर्ण मार्ग 2028पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 173 किमी लांब या मार्गाची योजना सर्वप्रथम 2007मध्ये आखण्यात आली होती. सासवड, नाशिक, अहिल्यानगर, कोकण आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनचालकांना या मार्गाचा मोठा फायदा होणार आहे. तब्बल 1,554.64 हेक्टर जमिनीवर हा मार्ग बनवण्यात येणार आहे. MSRDCकडून या प्रकल्पासं बांधकाम सुरू आहे.

    Pune-Ahilyanagar Highway: पुणे-अहिल्यानगर प्रवासात 45 मिनिटं वाचणार; देशातील सर्वात लांब उन्नत मार्गाचा विकास, कुठून-कुठे असेल मार्ग?

    खडकवासला, मुळशी, चाकण, हिंजवडी, सिंहगड, उर्से, सोरतापवाडी आणि वाडेबोल्हाई या गावांमध्ये बांधकाम सुरू आहे. दरम्यान, सांगरूण आणि डावजे गावांमध्ये बोगद्यांचं काम सुरू आहे. या प्रकल्पातील चार मुख्य भागांवर काम सध्या प्रगतीपथावर सुरू आहे.

    या सहा पदरी महामार्गासाठी भोर तालुक्यातील रांजे गावात एक 1.5 किमी लांब पूल असेल. या व्हायाडक्टने रिंग रोडला जमिनीवर पोहचवून उन्नत करण्यात येईल. या मार्गावरी सर्वात लांब बोगद्याचं सिंहगड किल्ल्याशेजारी सुरू आहे. हा बोगदा 5.87 किलोमीटर लांब असून रिंग रोडच्या पश्चिम भागातील सर्वात महत्त्वपूर्ण मार्ग आहे. यामुळे खामगाव मावळ आणि कल्याण गावाजवळील 35 किलोमीटर लांब घाट मार्गाला पर्याय उपलब्ध होणार आहे. एक तासाचा प्रवास अवघ्या काही मिनिटांत शक्य होणार आहे.

    पश्चिम आराखड्यात 8 जुळे बोगदे, सात व्हायाडक्ट, 10 पूल, 26 ओव्हरपास आणि 9 पादचारी अंडरपासचा समावेश आहे. मुंबईहून पश्चिम महाराष्ट्र आणि बंगळुरू प्रवासात वेळ वाचण्याची शक्यता आहे. याशिवाय, खडकवासला धरणावरही एक 500 मीटर लांब पूलाचं काम सुरू आहे. तसेच, कल्याण गावाजवळही काम वेगाने सुरू आहे.

    Maharashtra TimesVirar-Alibaug Corridor: अभयारण्यातून ‘विरार-अलिबाग कॉरिडोर’चा मार्ग; 5,043 खारफुटी बाधित होणार; नवा आराखडा सादर

    कोणत्या गावांमधून मार्ग?

    पूर्व आणि पश्चिम भागांमध्येही पुढे प्रत्येकी दोन टप्प्यात प्रकल्प विभागलेला आहे. फेज 1 आणि 2मध्ये पश्चिम आणि उत्तरेकडील काही गावांमधून मार्ग जाईल. NH50वरी चिंबळीपासून सुरू होऊन पुढे मोई, निघोजे, सांगुर्डे, शेलारवाडी, चांदखेड आणि घोटवडे गावांमार्गे खाली पिरंगुट फाट्यापर्यंत बांधण्यात येईल. दरम्यान, फेज 3 आणि 4मध्ये दक्षिण आणि पूर्वेकडील गावांना पिरंगुटशी भुगाव, चांदणी चौक, आंबेगाव आणि कात्रजमार्गे जोडणार आहे. पुढे पूर्व दिशेकडे मार्गाचा विस्तार होऊन होळकरवाडी आणि वाडकी सारख्या गावांना जोडून पुन्हा वाघोली आणि थेऊरफाट्याकडे वळणार आहे.

    सानिया कदम

    लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

    पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

    यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

    २०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

    लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed