हौसेला मोल नसते. तसेच हौस कोण कधी कशी पूर्ण करेल याचाही नेम नसतो. असाच एक प्रकार धाराशिव जिल्ह्यात घडलाय. जावयाला घोडे आवडतात आणि हे सासऱ्यांना माहिती होतं. पण देण्यासाठी निमित्त लागतं. त्यामुळे सासऱ्याने अधिक मास महिन्याचे निमित्त साधले आहे. सासऱ्याने जावयाला घोडी भेट म्हणून दिली आहे.
अधिकमास निमित्त सासऱ्याकडून जावायाला विशेष गिफ्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रहीम शेख, धाराशिव : राज्यभरात अधिक मासचा म्हणजेच धोंड्याचा महिन्याचा उत्साह आहे. धोंड्याच्या महिन्यात जावयाला सासरवाडीकडून विशेष मानपान मिळतो. सासरच्या मंडळींकडून जावयाला भोजनाचं निमंत्रण दिलं जातं. यासोबतच जावयाचं औक्षण केलं जातं. यावेळी जावयाला सासरच्या मंडळींकडून स्पेशल भेटवस्तू दिली जाते. जावयाला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेटवस्तू देण्याचा प्रयत्न सासऱ्याचा असतो. अर्थात जो तो आपापल्या ऐपतीनुसार भेटवस्तू देत असतो. पण राज्यभरात अधिक मासच्या महिन्यात जावयाचा सन्मान केला जातो. जावयाला धोंडा दिला जातो. हे सर्व सांगण्यामागचं कारण म्हणजे धाराशिवमध्ये एका जावयाला सासरच्या मंडळींकडून मिळालेलं विशेष गिफ्ट.
धाराशिवमध्ये अधिक मासनिमित्त सासऱ्याकडून जावयाला अनोखी भेट देण्यात आली आहे. या भेटीची पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगली आहे. महागाई आणि पेट्रोल दरवाढीच्या काळात जावयाला तब्बल सिंधी जातीची घोडी भेट देण्यात आली आहे. पारंपरिक धोंडे जेवणाच्या कार्यक्रमात ही आगळीवेगळी भेट देण्यात आल्याने उपस्थितांनी आश्चर्य व्यक्त केले. “पेट्रोलपेक्षा घोडीच परवडली”, अशा प्रतिक्रिया देखील नागरिकांमधून उमटत आहेत. या अनोख्या भेटीमुळे परिसरात उत्सुकता निर्माण झाली आहे. सासऱ्याकडून मिळालेली ही भेट पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
ईट येथील वकील क्रांतीसिंह राऊत यांचा विवाह कोरोनापूर्वी पारा येथील विलासराव झांबरे यांच्या मुलीशी झाला होता. आणि ऐन कोरोना काळात अधिक मास आला होता. या काळात सासऱ्याने जावयाची हौस केली नव्हती. कारण होते कोरोनाचा संकट काळ.
सध्या अधिक मास सुरू आहे. या महिन्यामध्ये जावयाला सासरी बोलावून पाहुणचार केला जातो आणि नंतर सोने स्वरूपात किंवा इतर वस्तू स्वरूपात त्यांना भेट दिली जाते. क्रांतिसिंह राऊत यांना देखील पारा येथील सासरवाडीत अधिकमासाचे जेवणाचे निमंत्रण दिले होते. सासरे विलासराव झांबरे यांना माहिती होते की जावई क्रांतीसिंह यांना घोडा आवडतो. नेमका हाच धागा पकडून सासरे विलासराव झांबरे यांनी केज तालुक्यातील साळेगाव येथील सलमान खान यांच्या माध्यमातून सिंधी जातीची घोडी आणली.
जावई क्रांतीसिंह राऊत यांना धोंडे जेवण खाऊ घातल्यानंतर ही सिंधी जातीची घोडी त्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. या घोडीची किंमत काहीही असली तरी हौसेला मोल नसते, सासऱ्याने जावयाची हौस पूर्ण केली आहे. जावई क्रांतीसिंह राऊत या घोडीवर बसून शेतात जातात. त्यांची दोन वेगवेगळ्या ठिकाणी शेती असल्या कारणामुळे या घोडीचा उपयोग आता त्यांना शेतात जाण्यासाठी होतो.
वाढलेले पेट्रोल, डिझेल, गॅस याचे दर गगनाला भिडले आहेत. पण घोडीला पेट्रोल, डिझेल, गॅस लागत नसल्यामुळे वकील क्रांतिसिंह राऊत यांना याचा खर्च सध्यातरी बसत नाही. घोडीला लागतो तो केवळ चारा. क्रांतिसिंह राऊत यांच्या या घोडीची चर्चा धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र होताना पाहायला मिळत आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा